ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. 30 - उरी दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांसाठी आयोजित संगीत कार्यक्रमात अक्षरश: एक कोटी रुपये उधळण्यात आले. सुरतचे व्यापारी महेश सवाणी यांनी उरी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ‘वतन के रखवाले’ हा भजन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गायक कीर्तीदान गढवी यांच्यावर तब्बल एक कोटी रुपयांची उधळण करण्यात आली.
जमा झालेली सर्व रक्कम शहीद जवानांच्या कुंटुंबांना देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक महेश सवाणी यांनी दिली आहे. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर काही वेळातच लोकांनी पैसे उधळण्यास सुरुवात केली. पैशांचा अक्षरश: पाऊस पडत होता.
कार्यक्रम आयोजित करण्यामागे उद्देश चांगला असला तरी अशा प्रकारे पैशांची उधळण करण्यावरुन मात्र टीका केली जात आहे. मदत करायची होती तर हाच पैसा कार्यक्रमात हजेरी लावलेल्या लोकांकडून गोळाही करता येऊ शकत होते असं काहींचं म्हणणं आहे.
Surat: Around Rs 1 cr showered on artists performing at a function organised to pay tribute to soldiers who lost their lives in #UriAttackpic.twitter.com/jAaOCQeg21— ANI (@ANI_news) September 30, 2016
Over Rs 1 crore has been collected, we'll divide this and send it to the families of soldiers who lost their lives in #UriAttack: Organiser pic.twitter.com/tBajd8hokM— ANI (@ANI_news) September 30, 2016
पैशांची उधळण करुन शहीदांना मदत करण्याची ही संकल्पना तुम्हाला पटते का ? तुमच्या प्रतिक्रिया कळवा