कर्जाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा
By admin | Published: August 11, 2015 12:03 AM
आरोपी फरार : अर्जदारांकडूनच पैसे उकळलेऔरंगाबाद : पाच टक्के दराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रकरणातील गुन्हेगार फरार झाला आहे.फसवणूक झालेल्या २५ ते ३० जणांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी प्रकरण आर्थिक ...
आरोपी फरार : अर्जदारांकडूनच पैसे उकळलेऔरंगाबाद : पाच टक्के दराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रकरणातील गुन्हेगार फरार झाला आहे.फसवणूक झालेल्या २५ ते ३० जणांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. सौरभ गुप्ता, नवराज सिंग आणि दिव्या कांबळे यांनी सिडको बसस्थानकाजवळील अक्षयदीप प्लाझामधील पहिल्या माळ्यावरील गाळा दोन महिन्यांपूर्वी भाड्याने घेतला. तेथे त्यांनी श्री शिवशक्ती इन्व्हेस्टमेंट ॲण्ड के्र डिटस् सर्व्हिसेस नावाचे कार्यालय सुरू केले. गरजूंना अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध केले जात असल्याची त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्यानंतर गरजूंनी त्यांच्या कार्यालयात गर्दी केली होती, असे पोलिसांनी सांगितले.दिव्या कांबळे नावाची तरुणी कर्ज प्रक्रिया समजून सांगायची. सुमारे तीनशे लोकांनी कर्जासाठी कंपनीकडे प्रस्ताव दाखल केले होते. त्यांना तुमची फाईल मुख्य कार्यालयास पाठविण्यात आल्याचे संबंधित कर्मचारी सांगत होते. कर्जासाठी अर्ज केलेल्यांकडून कंपनीच्या कर्मचार्यांनी ठराविक रक्कमही घेतली होती. मात्र १० ऑगस्टला सर्व अर्जदार कार्यालयात आल्यानंतर त्यांना नेहमीचे कोणीही कर्मचारी भेटले नाहीत. आरोपी आदल्या दिवशीच पसार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गंगापूर तालुक्यातील माळीवडगावचे नारायण निमुने यांनी कंपनीकडे ३० लाख रुपये कर्ज मागितले होते. त्यासाठी त्यांच्याकडून दोन टप्प्यांत १३ हजार आणि ६८ हजार ४०० रुपये पैसे घेण्यात आले. लाडसावंगी येथील कैलास शिंदे यांनाही पाच लाख रुपये कर्ज देण्याचे सांगत आरोपींनी ३४ हजार २०० रुपये घेतले होते. आरोपी एखाद्या मोठ्या फायनान्स कंपनीसारखा कारभार करीत. त्यांनी वेबसाईटही सुरू केली. मात्र दोन महिन्यांपासून त्यांनी त्यांच्या इतर कर्मचार्यांना वेतन दिले नसल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)