औरंगाबादमध्ये कोट्यवधींच्या कामांच्या पुस्तिका गहाळ
By admin | Published: May 15, 2015 11:33 PM
सार्वजनिक बाधंकाम : ३,६४८ कामांत घोटाळ्यांची शक्यता विकास राऊत औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विविध कामांचे ३ हजार ६४८ मेजर बुक (काम मापक पुस्तिका) गहाळ झाले आहेत. साधारणपणे एका बुकमध्ये १ लाख ते १ कोटी रुपयांच्या कामांच्या नोंदी असतात. मेजरबुकचे रेकॉर्ड विभागाकडे नसल्यामुळे कोणत्या कामाचे कसे व किती बिल ...
सार्वजनिक बाधंकाम : ३,६४८ कामांत घोटाळ्यांची शक्यता विकास राऊत औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विविध कामांचे ३ हजार ६४८ मेजर बुक (काम मापक पुस्तिका) गहाळ झाले आहेत. साधारणपणे एका बुकमध्ये १ लाख ते १ कोटी रुपयांच्या कामांच्या नोंदी असतात. मेजरबुकचे रेकॉर्ड विभागाकडे नसल्यामुळे कोणत्या कामाचे कसे व किती बिल अदा केले गेले आहे, याचा लेखाजोखा लेखा विभागालाही सांगता येत नाही. दुष्काळ आणि पाणीटंचाईला जिल्हा सामोरा जात असतानाच सर्कलमध्ये झालेल्या कोट्यवधी कामांचे मेजर बुक बदली होऊन गेलेले अभियंते, कंत्राटदार यांनीच गायब केल्याची चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाम उत्तर उपविभागातील सर्वाधिक ९७१ मेजरबुक गहाळ झाले आहेत. त्याखालोखाल उपविभाग क्र.१ मधील ८३७ मेजरबुक गहाळ आहेत. सूत्रांच्या मते कनिष्ठ, शाखा अभियंता यांची बदली झाल्यास मेजर बुकची देवाण-घेवाण केली जाते. त्याची कुणालाही माहिती नसते. चुकून कंत्राटदाराच्या घरी मेजर बुक राहतात. मेजर बुक शोधण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. प्रत्येक विभागातील १ हजारपैकी ७०० मेजरबुक कार्यालयाबाहेर आहेत. तर बिले देणे बंद...सार्वजनिक बांधकाम औरंगाबाद विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपविभागांतर्गत येणार्या गहाळ मेजरबुकची यादी क्रमांकासह प्रकाशित केली आहे. गहाळ मोजमाप पुस्तिका ज्यांच्याकडे असतील त्यांनी ८ दिवसांत संबंधित उपविभागात जमा कराव्यात. गहाळ झालेल्या मोजमाप पुस्तिकांमधील देयके (बिल) रद्द समजण्यात येतील. भविष्यात त्यातील बिले दिली जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.उपविभागनिहाय गहाळ मेजर बुकउत्तर उपविभाग- ९७१दक्षिण उपविभाग- २९३उपविभाग क्र.१ - ८३७यांत्रिकी उपविभाग- १२३फुलंब्री उपविभाग- २२६सिल्लोड उपविभाग- ५५६फर्दापूर उपविभाग- २७०पैठण उपविभाग- ३७२---------------------एकूण३,६४८