उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात शनिवारी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरून मिनी बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात २६ प्रवासी होते. ही मिनी बस रस्त्यावरून घसरली आणि सुमारे ६६० फूट खाली अलकनंदा नदीत पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून जखमींना एअरलिफ्ट करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. चालक घाबरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बसमधील २६ प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी झोपले असल्याचे बोलले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून चोपटा-तुंगनाथ-चंद्रशिला ट्रेकिंगसाठी २६ प्रवाशांचा ग्रुप निघाला होता. बद्रीनाथ महामार्गावर चालकाला झोप लागल्याने सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.