मथुरा : उत्तर प्रदेशातल्या मथुरा जिल्ह्यातील बरसाना येथे असलेल्या राधारानी मंदिरात शॉर्ट्स, नाईट सूट, मिनी स्कर्ट, टॉर्न जीन्स, हाफ पँट, बर्मुडा परिधान करून येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. तसे पोस्टर मंदिराबाहेर लावण्यात आले आहे.
भाविकांच्या पेहेरावाबाबत राधारानी मंदिराने तयार केलेल्या नियमाची एक आठवड्यानंतर अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती या मंदिर समितीचे पदाधिकारी रासबिहारी गोस्वामी यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी राधा दामोदर मंदिरानेही पेहेरावाबाबत काही नियम लागू केले होते. बदायूं जिल्ह्यातील बिरुआ बाडी मंदिरानेही भाविकांच्या पेहेरावाबाबत नियम लागू केले होते. (वृत्तसंस्था)
भाविकांकडून विरोध होण्याची शक्यताभाविकांनी कोणत्या पेहेरावात यावे याबाबत देशातील अनेक मंदिरांनी नियम केले आहेत. आम्हीही त्यांच्या प्रमाणेच निर्णय घेतला असल्याचे उत्तर प्रदेशातील मंदिरांचे म्हणणे आहे. या नियमांना भाविकांकडून विरोध होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.