शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

CM योगींच्या शेजारी 'भूत बंगला', राहण्यास घाबरतात मंत्री व अधिकारी

By admin | Published: March 29, 2017 6:03 PM

उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊच्या कालिदास मार्गावरील बंगला क्रमांक 5 मध्ये राहणार तर...

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 29 -उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊच्या कालिदास मार्गावरील बंगला क्रमांक 5 मध्ये राहणार आहेत. त्यांच्या शेजारी बंगला क्रमांक 6 आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी राहण्याची कोणाची इच्छा नसेल, पण खरंतर या बंगल्यात राहण्यास अधिका-यांपासून मंत्र्यांपर्यंत सगळे टाळाटाळ करत आहेत. 
 
आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्रीही या बंगल्यात राहण्यास नकार देत आहेत. 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे.  यामागचं कारण काय याबाबत तुम्हालाही उत्सुकता असेल. याचं कारण आहे, या बंगल्याचा इतिहास. हा बंगला अपशकुनी असल्याचं म्हटलं जातं. या बंगल्यात जो कोणी राहायला आला तो नेहमी वादात अडकला.
 
बंगल्यात राहायला आलेले नेहमी कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडले. मुलायम सरकारच्या काळात मुख्य सचिव असलेल्या  नीरा यादव  या बंगल्यात राहात होत्या. त्या नोयडा प्लॉट घोटाळ्यामध्ये अडकल्या आणि त्यांना तुरूंगाची हवाही खावी लागली. असंच एक  उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहणारे अमर सिंग. तेही याच बंगल्यात कधीकाळी राहात होते. आज त्यांची राजकिय कारकीर्द अडचणीत आहे. प्रदीप शुक्ला हे आणखी एक नेता एनएचआरएम घोटाळ्यामध्ये अडकले. मायावती यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले बाबू सिंग कुशवाहा यांचंही एक नाव आहे. त्यांच्याकडे अऩेक विभागांची जबाबदारी होती. पण सीएमओ खून ,  एनएचआरएम  आणि लॅकफेड घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. अशा प्रकारची अनेक नावं आहेत.   
 
याशिवाय स्थानीक लोकं याला भूत बंगलाही म्हणतात. त्यामुळे कोणी मंत्री अथवा अधिकारी या बंगल्यात राहण्यास टाळाटाळ करत आहेत.