१५ रूपयांच्या मक्याच्या कणसाला केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं महाग; म्हणाले, “इथे फ्री मिळतं”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 08:05 AM2022-07-22T08:05:30+5:302022-07-22T08:07:12+5:30
केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ते १५ रूपयांचं मक्याचं कणीस महाग असल्याचं म्हणताना दिसतायत.
केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते रस्त्यावरच मक्याचं कणीस खरेदी करत आहेत. परंतु त्यांना या कणसाची किंमत जास्त असल्याचं वाटतं, म्हणून इथे मक्याचं कणीस फ्री मिळतं असंही ते म्हणतात.
केंद्रीय ग्राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी स्वतः हा व्हिडीओ ट्विट केला आहे. इथे त्यांनी महाग असलेल्या भागाचा उल्लेख केला नाही. पण ही गोष्ट व्हिडीओत ऐकायला मिळते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून मंत्र्यांना आता महागाई समजली असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
आज सिवनी से मंडला जाते हुए। स्थानीय भुट्टे का स्वाद लिया। हम सभी को अपने स्थानीय किसानों और छोटे दुकानदारों से खाद्य वस्तुओं को ख़रीदना चाहिए। जिससे उनको रोज़गार और हमको मिलावट रहित वस्तुएँ मिलेंगी। @MoRD_GoI@BJP4Mandla@BJP4MPpic.twitter.com/aNsLP2JOdU
— Faggan Singh Kulaste (@fskulaste) July 21, 2022
फग्गन सिंह यांनी शेअर केलेला व्हिडीओ मध्यप्रदेशातील सिवनी ते मंडला दरम्यानचा आहे. स्थानिक शेतकरी आणि छोट्या दुकानदारांकडून वस्तूंची खरेदी केली पाहिजे. जेणेकरून त्यांना रोजगार आणि आपल्या भेसळमुक्त वस्तू मिळतील असं त्यांनी या व्हिडीओसोबत लिहिलं आहे.
काय म्हणतायत मंत्री?
व्हिडीओमध्ये फग्गन सिंह हे गाडीतून उतरून मक्याचं कणीस देण्यासाठी सांगतात. ते जेव्हा त्याचा भाव विचारतात तेव्हा समोरची व्यक्ती त्यांना ३ कणसांची किंमत ४५ रूपये सांगते. यावर मंत्री त्या व्यक्तीला इतकं महाग देतो का? इथे तर मक्याचं कणीस फ्री मिळतं असं ते सांगतात. यावर दुकानदार त्यांना आपण एक कणीस ५ रूपयांना विकत आणल्याचं सांगतो. यानतंर ते त्याचं नाव विचारत मक्याची कणसं डझनाच्या हिशोबानं का किलोच्या हिशोबानं देतो असं विचारतात. त्यानंतर ते आपल्या खिशातून पैसे काढून पुढील प्रवासासाठी निघून जातात.