शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

Nitin Gadkari : केव्हा दूर होणार महाराष्ट्र सरकारवरील संकट? गडकरी म्हणाले, "आगे आगे देखिए होता है क्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 1:05 PM

महाराष्ट्र सरकारवर आलेल्या संकटामागे भाजप आहे? यावर गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, मी एवढे नक्की सांगेन, की जर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले, तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल. 

देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर आलेल्या संकटासंदर्भात भाष्य केले आहे. मला वाटते, की महाराष्ट्र सरकारवरील संकट लवकरच दूर होईल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. यावेळी, हे संकट आपण दूर कराल का? असा प्रश्न विचारला आला असता, गडकरी म्हणाले, "आगे-आगे देखो होता है क्या."

गडकरी म्हणाले, आजच्या समस्येत उद्याची उत्तरं लपलेली असतात. लवकरच सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळतील. आलेले ढग दूर होतील. अंधकार नष्ट होईल आणि सूर्य उगवेल. यावर, सीएम ठाकरेंवर घोंगावणारे ढग दूर होतील का? आपले आणि त्यांचे संबंध अगदी जवळचे आहेत, असे मानले जाते? असा प्रश्न केला असता, गडकरी म्हणाले, वेयक्तीक संबंध, हे राजकीय संबंधांपेक्षा वेगळे असतात. मग ते सरकारमध्ये असोत अथवा नसोत. संबंध तसेच असतात. ते झी टीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत गडकरी म्हणाले, ते (वाजपेयी) म्हणाले होते, सरकारे येतात आणि जातात, पार्ट्या तयार होतात आणि संपतात, पण देश हाच असतो. सर्वांना देशासाठी काम करायचे आहे. भारताला महाशक्ती बनविण्यासाठी काम करायचे आहे. आपण चालत राहायला हवे, हा प्रकृतीचा निय आहे.  

महाराष्ट्र सरकारवर आलेल्या संकटामागे भाजप आहे? यावर गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, मी एवढे नक्की सांगेन, की जर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले, तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना