ऑनलाइन लोकमत
सिलिगुरी, दि. 29 - केंद्र सरकारने गाडीवरील लाल दिवा हटवण्यास सांगितलं असलं तरी पश्चिम बंगालचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अरुप बिस्वास मात्र बिनदिक्कतपणे लाल दिव्याचा वापर करत आहेत. "आमच्या सरकारने अद्यापपर्यंत लाल दिव्यावर बंदीवर आणलेली नाही. तसंच आम्ही इतरांचे आदेश पाळण्यासाठी बांधील नाही", असं अरुप बिस्वास बोलले आहेत.
केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याच्या दृष्टीने फक्त तात्काळ सेवा देणा-या गाडींवरच लाल दिवा ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये पोलीस, संरक्षण आणि निमलष्करी दल यांचा समावेश आहे. यांना वेगवेगळ्या लाल, निळ्या आणि पांढ-या रंगाचे दिवे वापरण्याची परवानगी आहे.
व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या दृष्टीकोनातून केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्याच महिन्यात सर्व गाड्यांवरुन लाल दिवे हटवण्याचा निर्णय घेतला होता. 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांना या निर्णयातून सूट देण्यात आली आहे.
Despite a national ban, West Bengal minister Arup Biswas using red beacon atop his car, says "Our government has not banned it yet." pic.twitter.com/iy6dSPauTr— ANI (@ANI_news) May 29, 2017
यासंबंधी जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की, राज्यातील वाहतूक विभागाने ज्यांना लाल दिवा वापरण्याची परवानगी आहे अशा गाड्यांची यादी प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. जेणेकरुन लोकांना याची माहिती असेल. ही बंदी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्य केंद्रीय मंत्री, प्रशासकीय अधिकारी, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना लागू आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभा अध्यक्षांना ही बंदी लागू नाही.