काँग्रेस आक्रमक : जन. सुहाग यांच्यावरील कारवाई बेकायदाशीलेश शर्मानवी दिल्ली : भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्ट. जन. दलबीरसिंग यांच्यावर तत्कालीन लष्करप्रमुख जन. व्ही. के. सिंग यांनी शिस्तभंगाच्या आधारावर एप्रिल ते मे २०१२ मध्ये आणलेली बंदी पूर्वनियोजित, संदिग्ध आणि बेकायदेशीर असल्याचा खुलासा केंद्र सरकारने सवार्ेच्च न्यायालयात केला आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेल्या जन. व्ही. के. सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे. येत्या काळात सिंग यांच्या अडचणी वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आपल्याच सरकारमध्ये मंत्री असलेल्या व्ही. के. सिंग यांच्याबाबत मोदींनी अविश्वास दाखवला असून सिंग यांनी स्वत: राजीनामा द्यावा किंवा पंतप्रधानांनी त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी केली आहे. सरकारच जर एखाद्या मंत्र्यावर प्रतिज्ञापत्रात अविश्वास दाखवत असेल तर संसदीय प्रणालीत अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार उरत नाही, असे ते म्हणाले.काँग्रेसला मिळाले पहिले अस्त्रव्ही. के. सिंग यांना घेरण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा विचार आहे. मोदींनी सिंग यांना हटवावे किंवा न्यायालयाकडून ताशेरे ओढले जावे, याची काँग्रेसला प्रतीक्षा आहे. काँग्रेसने मोदी सरकारविरुद्ध पहिले अस्त्र उगारण्याची रणनीती आखली आहे.सुहाग यांच्यावरील बंदी पूर्वनियोजित होतीलेफ्ट. जन. दलबीरसिंग यांच्यावर तत्कालीन लष्करप्रमुख जन. व्ही. के.सिंग यांनी शिस्तभंगाच्या आधारावर एप्रिल ते मे २०१२ मध्ये आणलेली बंदी पूर्वनियोजित संदिग्ध आणि बेकायदेशीर असल्याचा खुलासा केंद्र सरकारने सवार्ेच्च न्यायालयात केला आहे.सुहाग यांच्यावर शिस्त आणि दक्षता (डीव्ही) प्रतिबंध आणण्यात आला होता. सुहाग हे दीमापूर येथे ३ कॉर्पचे कमांडर असताना नेतृत्त्वातील उणीवा गुप्तचर विभागाच्या गोपनीय कामगिरीतील अपयश याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. विद्यमान लष्करप्रमुख जन. विक्रमसिंग हे ३१ जुलै रोजी निवृत्त झाल्यावर जन. सुहाग त्या जागी रुजू होणार आहेत. ले. जन. सुहाग यांच्या निवडीला ले. जन. रवी दास्ताने यांनी आव्हान दिले असून संरक्षण मंत्रालयाने त्याप्रकरणी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संरक्षण मंत्रालयाने ही भूमिका स्पष्ट केली आहे. आदेश फिरविला...व्ही.के. सिंग हे याच काळात निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी आलेले नवे लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी आधीचा आदेश फिरवत जन. सुहाग यांना पदोन्नती दिली. जन. सुहाग यांचा बचाव करताना सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्ही. के. सिंग यांची कारवाई कशी पूर्वग्रहदूषित आणि सूडबुद्धीची होती हे स्पष्ट केले आहे. संपुआ सरकारने अखेरच्या काळात सेवाज्येष्ठतेनुसार जन. सुहाग यांच्याकडे लष्करप्रमुखपद सोपविले होते.
लष्करी कारकिर्दीतील निर्णयाने राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांची कोंडी
By admin | Published: June 10, 2014 10:40 PM