तामिळनाडू भावुक : शिक्षेविरोधात जयललितांनी घेतली उच्च न्यायालयात धाव
चेन्नई : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ओ़ पन्नीरसेल्वम यांनी सोमवारी साश्रुनयनांनी शपथ घेतली़ राज्यपाल के. रोसय्या यांनी राजभवनात आयोजित सोहळ्यात त्यांना मुख्यमंत्रिपदाची आणि अण्णाद्रमुकमधील त्यांच्या अन्य सहका:यांना मंत्रिपदाची शपथ दिली. शपथ घेताना ओ़ पन्नीरसेल्वम कमालीचे भावुक झाले होत़े राज्यपाल के. रोसय्या त्यांना शपथ देत असताना, पन्नीरसेल्वम सारखे डोळ्यांतील अश्रू पुसत होत़े राज्यपाल त्यांना धीर देताना दिसल़े अण्णाद्रमुकच्या इतर मंत्र्यांनीही भरल्या डोळ्यांनीशपथ घेतली. शपथविधी सोहळ्यासाठी मीडियाला आणि विरोधी पक्ष सदस्यांना निमंत्रित केले गेले नव्हत़े
जयललिता यांनी सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेत घेतली़ शिक्षेविरुद्ध दाद मागतानाच जयललितांनी जामिनासाठीही अर्ज केला़ त्यांचे सहकारी शशिकला, व्ही़ एऩ सुधाकरन आणि इलावरासी यांनीही उच्च न्यायालयात आपल्या शिक्षेला आव्हान दिल़े जामीन अजर्ही दाखल केला़
अम्मांसाठी तामिळनाडूत आत्महत्या सत्र
जयललिता यांना विशेष न्यायालयाने चार वर्षे कैदेची शिक्षा ठोठावल्यानंतर आत्महत्या आणि हृदयविकाराच्या धक्क्याने तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आह़े जयललितांची तुरुंगात रवानगी झाल्याच्या तिस:या दिवशीही तामिळनाडूत ठिकठिकाणी निदर्शने सुरूच राहिली.
जयललिता यांना शिक्षा ठोठावल्याचे समजताच अण्णाद्रमुक कार्यकर्ता
एस़ व्यंकटेशन (65) याने स्वत:ला पेटवून घेतल़े तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली़ तर अन्य एकाने वेगाने येणा:या बससमोर उडी घेऊन प्राणयात्र संपवली़ जयललितांना शिक्षा झाल्याची बातमी पचवू न शकल्याने सुमारे
11 जणांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला़ कथितरीत्या आत्महत्या करणा:यांमध्ये 12व्या इयत्तेत शिकणा:या विद्याथ्र्याचाही समावेश होता़