नवी दिल्ली - नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय रेल्वेकडून देशभरातील कोट्यवधी प्रवाशांना भाडेवाढीचे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने केलेली नवी भाडेवाढ ही 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे. रेल्वेने आपल्या प्रवासी भाडेदरामध्ये कमाल 4 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रेल्वेने मेल/एक्स्प्रेसच्या नॉन एसीच्या भाड्यात दोन पैसे प्रति किमी एवढी वाढ करण्यात आली आहे. तर एसी ट्रेनच्या भाड्यामध्ये 4 पैसे प्रतिकिमी एवढी वाढ करण्यात आली आहे. मात्र रेल्वेच्या उपनगरीय लोकलसेवेच्या प्रवासी भाडेदरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.
रेल्वेच्या तिकिटांमध्ये झालेली भाडेवाढ पुढीलप्रमाणे ऑर्डिनरी नॉन एसीचे भाडे सेकंड क्लास ऑर्डिनरी - एक पैसा प्रतिकिमी स्लीपर क्लास ऑर्डिनरी - एक पैसा प्रतिकिमी फर्स्ट क्लास ऑर्डिनरी - एक पैसा प्रतिकिमी मेल/एक्स्प्रेस नॉन एसीचे भाडेसेकंड क्लास (मेल/एक्स्प्रेस) - 2 पैसे प्रति किमी स्लीपर क्लास ( मेल/एक्स्प्रेस) - 2 पैसे प्रति किमी फर्स्ट क्लास (मेल/एक्स्प्रेस) - 2 पैसे प्रति किमी एसी ट्रेनचे भाडे एसी चेअर कार - 4 पैसे प्रति किमी एसी 3 टियर - 4 पैसे प्रति किमी एसी 2 टियर - 4 पैसे प्रति किमी एसी फर्स्ट क्लास/ इकॉनॉमी क्लास/ एक्झिक्युटिव्ह क्लास - 4 पैसे प्रतिकिमी