शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मित्रासह ९ जणांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दुचाकीवर घरी सोडण्याचे निमित्त, झारखंडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 2:54 AM

मित्र वगळता इतर आठ जणांना ही मुलगी ओळखत नाही. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, दुमका गावातून मला माझ्या दोन मित्रांनी गुरुवारी दुपारी दुचाकीवरून माझ्या खेड्याजवळ सोडले.

नवी दिल्ली : झारखंडच्या दुमका जिल्ह्यात १६ वर्षांच्या मुलीवर नऊ जणांनी बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. सर्व आरोपी फरार आहेत.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे या मुलीने घरी परतण्यासाठी मित्राची मदत मागितली होती. त्याने तिची दिशाभूल करून जंगलातून लवकर घरी जाऊ, असे तिला सांगितले. मुलीने तिचा मित्र आणि इतर आठ जणांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

मित्र वगळता इतर आठ जणांना ही मुलगी ओळखत नाही. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, दुमका गावातून मला माझ्या दोन मित्रांनी गुरुवारी दुपारी दुचाकीवरून माझ्या खेड्याजवळ सोडले. नंतर तिने तिच्या आणखी एका मित्राला बोलावून मला माझ्या खेड्यात नेऊन सोड अशी विनंती केली. तो मित्र आणखी एकाला घेऊन तेथे पोहोचला. मित्रासोबत आलेला मला अनोळखी होता.

पोलीस वाहनांची तपासणी करीत असल्यामुळे आपण जंगलातून जाणाऱ्या जवळच्या रस्त्याने जाऊ, असे त्या मित्राने मला सांगितले, असे तिने म्हटले. जंगलात गेल्यावर तेथे सात अनोळखी लोक होते. त्यांनी व आधीच्या दोन जणांनी माझ्यावर अत्याचार केला.बेवारस कारमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेहकोरापूत (ओदिशा) : बेपत्ता झालेल्या सहा वर्षांच्या मुलीचा गळा चिरलेला मृतदेह बेवारस सोडून दिलेल्या कारमध्ये आढळला. मुलीची हत्या करून नंतर मृतदेह कारमध्ये ठेवला, असा संशय आहे. कांचना (जिल्हा कोरापूत) खेड्यात बेवारस सोडून दिलेल्या कारमध्ये मुलीचा मृतदेह असल्याचे स्थानिक रहिवाशांना लक्षात आल्यावर त्यांनी मचकुंड पोलिसांना सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांचना खेड्यात विधवा तिच्या दोन मुलींसह राहते. शनिवारी ती कामाला गेल्यावर दोन्ही मुलींना घरी ठेवते. सायंकाळी महिला घरी परतल्यावर तिला मुली घरात दिसल्या नाहीत. त्या शेजारी टीव्ही बघायला गेल्या असतील, असे तिला वाटले.दरम्यान, तिची मोठी मुलगी घरी परतली. परंतु धाकटी बेपत्ता झाली. बराच वेळ धाकटी मुलगी घरी परतली नाही. चिंताग्रस्त आई खेड्यातील ज्येष्ठांकडे गेली. खेड्याभोवती शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. दुसºया दिवशी ग्रामस्थांना तिचा मृतदेह बेवारस कारमध्ये आढळला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी