संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 08:50 AM2020-03-01T08:50:28+5:302020-03-01T09:03:30+5:30

अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांनी तिला बेदम मारहाण केली आहे.

minor girls braid chopped off by family for speaking to boy over phone in mp SSS | संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा

संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देमध्य प्रदेशच्या अलीराजपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.मुलगी एका मुलासोबत फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांनी तिला बेदम मारहाण केली.पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. 

अलिराजपूर - मध्य प्रदेशच्या अलीराजपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाशी फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून कुटुंबियांनी भरचौकात मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच त्यानंतर तिला भयंकर शिक्षा देखील देण्यात आली. सर्वांसमोर तिचे केस कापले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अलीराजपूरमधील सोंडवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांनी तिला बेदम मारहाण केली आहे. भरचौकात गावकऱ्यांसमोर मारहाण करून तिचे केस कापले. 25 फेब्रुवारीला ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज बब्बर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 'गेल्या वर्षी मी गुजरातमध्ये मोलमजुरीसाठी गेले होते. त्यावेळी अलीराजपूरमधल्या सुमनियावाट गावातील मुलाशी ओळख झाली. जेव्हा घरी परतली तेव्हा मुलाने अलीराजपूर बस स्टँडवर भेटायला बोलावलं होतं. बस स्टँडवर पोहोचली तेव्हा घरच्या लोकांनी पाहिलं. मुलाशी बोलते म्हणून कुटुंबियांनी बेदम मारहण केली' अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

India vs New Zealand 2nd Test : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी झोडपलं, टीम इंडियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं

"अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासाठी घटना सार्वजनिक दृष्टिपथात होणे आवश्यक"

दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार पैसे

मेलानिया यांच्या ट्विटमुळे ‘हॅप्पीनेस क्लास’ जगभरात; केजरीवाल सरकारच्या उपक्रमाचे कौतुक

 

Web Title: minor girls braid chopped off by family for speaking to boy over phone in mp SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.