मथुरा - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना देखील समोर येत आहेत. प्रसाद घ्यायला पुन्हा रांगेत उभे राहिले म्हणून मथुरामध्ये लहान मुलांना बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मथुरा जिल्ह्यातील मंत परिसरात दोन लहान मुलांना काही लोकांनी दोरीने बांधून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमात प्रसाद घेण्यासाठी मुलं पुन्हा रांगेत उभी राहिली. त्यावेळी संतापलेल्या लोकांनी मुलांना मारहाण केली आहे.
मुलांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 24 जुलै रोजी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. दहा ते बारा वर्षांच्या दोन मुलांना लोकांनी दोरीने बांधून ठेवत बेदम मारहाण केली. मुलांनी खूप आरडाओरडा केला पण कोणीच त्यांच्या मदतीला धावून आलं नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत मारहाण करणाऱ्या लोकांना अटक केली आहे. जिल्हा बाल अधिकार संस्थेने या घटनेबाबत उत्तर प्रदेश राज्य बाल संरक्षण आयोग आणि जिल्हा बालकल्याण समितीला याबाबत माहिती दिली आहे. मारहाण करण्यात आलेल्या मुलांपैकी एक मुलगा हा गावातील आहे. तर दुसरा एका मजुराचा मुलगा आहे, अशी माहिती मथुरा येथील चाइल्डलाइनचे जिल्हा समन्वयक नरेंद्र परिहार यांनी दिली आहे.
प्रसाद घेण्यासाठी आम्ही पुन्हा रांगेत उभे राहिलो होतो. त्यामुळे काही लोकांनी नाराजी व्यक्त केली अशी माहिती एका मुलाने दिली आहे. या प्रकरणी पवन कुमार आणि सुशील कुमार या दोघांविरोधात मंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं
काय सांगता? कोरोनाला दूर ठेवणारा Sanitizer Pen आला, लिहिताना हातही होणार स्वच्छ
CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात