शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
5
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
6
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
7
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
8
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
9
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
11
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
12
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
13
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
14
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
15
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
16
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
17
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
18
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
19
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार

गर्भवती असलेल्या अल्पवयीन प्रेयसीची निर्घृण हत्या; जंगलात पुरुन ठेवला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 1:51 PM

दिल्लीतल्या एका अल्पवयीन गर्भवती मुलीची प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Delhi Crime : दिल्लीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये दिल्लीतील एका गर्भवती अल्पवयीन मुलीची  प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह जमिनीत पुरला होता. आरोपी प्रियकराला मुलीसोबत लग्न करायचे नव्हते तसेच त्याला बाळही नको होते. त्यामुळे नियोजन करुन प्रियकराने मुलीची हत्या केली. मात्र पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या एका मित्राला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रियकराने आपण हिंदू असल्याचे अल्पवयीन मुलीला सांगितले होते. मात्र कुटुंबियांच्या दाव्यानुसार आरोपी हा मुस्लिम आहे. पोलीस या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध घेत असून या दाव्याचाही तपास करत आहेत.

सोनिया असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. अनेकदा ती फोनवर बोलायचे पण जेव्हा घरातील कोणी विचारले तर ती मी भूतासोबत बोलत आहे असं म्हणायची. ती सोशल मीडियावर रील देखील बनवायची. सोनियाचे जवळपास सात हजार फॉलोअर्स होते. करवा चौथच्या दिवशी सोनिया घरातून तिचे सर्व सामान घेऊन प्रियकर संजूकडे गेली होती. मात्र ती परत आली नाही. तपासानंतर तिचा मृतदेह थेट जमिनीखाली गाडलेला आढळून आला. करवा चौथच्या दिवशीच संजूने सोनियाची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीखाली पुरला.

सोनिया भूताच्या प्रेमात पडल्याचे कुटुंबीयांना माहीत होते. तो भूत म्हणजे संजू आहे हे देखील कुटुंबियांना कळलं होतं. सोनियाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जेव्हा आम्ही संजूच्या घरी गेले तेव्हा त्यांना समजले की तो सलीम आहे. कुटुंबीयांनी तो मुस्लिम असल्याचा दावा केला. या प्रकरणाची तक्रार दिल्ली पोलिसांना २३ ऑक्टोबर रोजी मिळाली. यानंतर पोलिसांनी सलीमला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

चौकशीत संजू उर्फ ​​सलीमने हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सलीमने आधीच हत्येचा कट होता. त्याने त्याचे दोन मित्र हृतिक आणि पंकज यांनाही कटात सामील केले होते. सोनियाला मारण्यासाठी त्यांनी करवा चौथचा दिवस निवडला. करवा चौथच्या दिवशी सोनिया नांगलोई भागात सलीमला भेटली. तेथून सलीमने तिला रोहतकला नेले आणि वाटेतच तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्यांनी सोनियांचा मृतदेह जंगलात पुरला आणि त्यानंतर ते दिल्लीत आले.

सलीमने सोनियाची हत्या केली तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी सलीमला अटक केली तेव्हा तो नंबर प्लेट नसलेल्या बाईकवरून फिरत होता. त्याच्याकडे सापडलेला आयडी सोनियांच्या वडिलांचा होता. यानंतर सोनियांच्या वडिलांना माहिती देण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. सलीमने दिलेल्या माहितीवरुन पोलिस त्या ठिकाणी पोहोचले जिथे त्यांनी सोनियांचा मृतदेह पुरला होता. सध्या या प्रकरणी सलीम आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस