CoronaVaccine: कोरोना लसीचा चमत्कार; एका तासात पॅरालिसीस ठीक झाला; रुग्णाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 02:07 PM2021-06-27T14:07:21+5:302021-06-27T14:08:03+5:30

Corona vaccine cure Paralysis मध्य प्रदेशमध्ये हा प्रकार घडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या व्यक्तीला लकवा मारला होता. अनेक ठिकाणी उपचार घेतले होते, मात्र काहीच फरक पडला नव्हता.

miracle of the corona vaccine; Paralysis was cured within an hour, patient's claim | CoronaVaccine: कोरोना लसीचा चमत्कार; एका तासात पॅरालिसीस ठीक झाला; रुग्णाचा दावा

CoronaVaccine: कोरोना लसीचा चमत्कार; एका तासात पॅरालिसीस ठीक झाला; रुग्णाचा दावा

Next

एकीकडे कोरोना लसीबाबत (Corona vaccine) नाना तऱ्हेच्या अफवा पसरू लागल्या आसताना आता त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. लस घेतल्यावर अंगाला चमचे, वाट्या चिकटत असल्याचे आढळले होते. आता एका व्यक्तीने लस घेतल्याच्या तासाभरातच पॅरालिसीस ठीक झाल्याचा दावा केल्याने डॉक्टरही अचंबित झाले आहेत. (Corona vaccine cure Paralysis of madhya pradesh resident.)

मध्य प्रदेशमध्ये हा प्रकार घडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या व्यक्तीला लकवा मारला होता. अनेक ठिकाणी उपचार घेतले होते, मात्र काहीच फरक पडला नव्हता. राजगढ जिल्ह्यातील सारंगपूरचे रहिवासी अब्दुल मजीद खान यांनी सकाळी १०.३० वाजता कोरोना लस घेतली. गेल्या सहा-सात महिन्य़ांपासून त्यांना पॅरालिसीस झाला होता. चेहऱ्यावरही परिणाम झाल्याने ते नीट बोलू शकत नव्हते. 

कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना फरक जाणवायला लागला. लस घेतल्यानंतर काही वेळातच त्यांचे लकवा मारलेले अवयव हलविता येऊ लागले. जे अवयव सुन्न झाले होते, ते हालचाल करू लागले. यामुळे खान हे आता कोरोना लसीला वरदान म्हणू लागले आहेत. अनेक डॉक्टरांनी यावर उपचार केले होते. जो जिथला डॉक्टर चांगला तिथे ते जात होते. आता लस घेतल्याने लकवा बरा झाल्याने ते आता लोकांना कोरोना लस घेण्याचे सांगत आहेत. 

लस घेतल्यानंतर त्यांना ७५ टक्के आराम मिळाला आहे. पॅरालिसीसमुळे त्यांना बोलण्यास त्रास होत होता. आता सुस्पष्ट बोलू शकत असल्याचे ते म्हणाले. राजगढ जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. सुधीर कलावत यांनी सांगतिले की, त्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली होती. त्यांच्या दाव्यानुसार ते पॅरालिसीसपासून बरे झाले आहेत. हा चमत्कार सायकॉलॉजीकल किंवा लसीचा परिणाम असू शकतो. काहीही असले तरी यावर अभ्यास होण्याची गरज आहे. 

Web Title: miracle of the corona vaccine; Paralysis was cured within an hour, patient's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.