ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 15 - जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मीरवाइज उमर फारुख यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाचे कौतुक करुन नवीन वाद निर्माण केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत बुधवारी पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर मीरवाइज उमर फारुख यांनी टि्वट करुन पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या.
संध्याकाळची नमाज अदा केल्यानंतर फटाक्यांचे आवज ऐकले. वेल प्लेड पाकिस्तान, अंतिम फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा असे टि्वट फारुख यांनी केले आहे. आज भारता विरुद्ध बांगलादेश असा उपांत्यफेरीचा सामना होत असून, कोटयावधी क्रिकेट चाहत्यांची भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम मुकाबला व्हावा अशी इच्छा आहे. मग त्यावेळी फारुख कोणासोबत असतील असा प्रश्न विचारला जात आहे.
काल पाकिस्तानने इंग्लंडवर आठ विकेटने सहज विजय मिळवला. इंग्लंडचे 212 धावांचे आव्हान पाकिस्तानने 2 विकेट गमावून सहज पार केले. मीरवाइज उमर फारुख यांनी टि्वटमधून बगावत खोरीची भाषा केली असून, योग्यवेळी या टि्वटचा योग्य विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे.
As we were finishing taraweeh,could hear the fire crackers bursting, well played team #Paksitan. Best of luck for the finals!— Mirwaiz Umar Farooq (@MirwaizKashmir) June 14, 2017