बिग बॉस १६ आणि खतरोंके खिलाली १३ मधून चर्चेत आलेली अभिनेत्री अर्चना गौतम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्चना हिने २०२१ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. हल्लीच ती नवी दिल्लीमधील पक्षाच्या मुख्यालयात वडिलांसोबत आली होती. त्यावेळी काँग्रेस कार्यालयाबाहेर तिच्यासोबत गैरवर्तन कऱण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणावर अर्चना हिने मौन बाळगले आहे. मात्र सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अर्चना गौतम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. देशात होणाऱ्या विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडत असते. मात्र तिचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे, त्यामध्ये अर्चना गौतम आणि तिच्या वडिलांसोबत भररस्त्यामध्ये गैरवर्तन होताना दिसत आहे. आता त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये या दोघांसोबत गैरवर्तन होताना दिसत आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार अर्चना गौतम आणि तिचे वडील दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात आले होते. तसेच ते कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. अर्चना गौतम आणि तिच्या वडिलांनी सांगितले की, संसदेमध्ये महिला बिला पारित झाल्यानंतर पक्षाचे नेते प्रियंका गांधी आमि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या दोघांसोबत असं करण्यामागचं एक कारण देण्यात येत आहे. ते कारण म्हणजे अर्चना गौतमच्या वडिलांनी प्रियंका गांधींचे पीएस संदीप सिंह यांच्याविरोधात यावर्षी मार्च महिन्यात खटला दाखल केला होता. प्रियंका गांधींच्या पीएने त्यांच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप त्यांनी केला होता. तसेच मेरठ पोलिसांनी या प्रकरणी आयपीएसीच्या कलम ५०४ आणि ५०६ तसेच एसटी-एसटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता.
अर्चना गौतम हिने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकही लढवली होती. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत हस्तिनापूर मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र तिला भाजपाच्या दिनेश खटिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.