'हे न जुळणारं गणित, पेट्रोल 50 रुपयांनी कमी व्हायला पाहिजे होतं'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:57 PM2021-11-03T22:57:04+5:302021-11-03T22:57:34+5:30
देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. अनेक राज्यांत पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांवर पोहोचले होते.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, देशात 04 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 10 रुपयांची कपात होणार आहे. त्यामुळे, देशातील सर्वसामान्य जनतेला मोदी सरकारने दिवाळी भेट दिल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, विरोधकांनी मोदी सरकावर टीका केली आहे. काँग्रेसनं केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे जुमलेबाजी असल्याचं म्हटलंय. तर, राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनीही हा निर्णय दिलासादायक नसल्याचे म्हटले.
देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. अनेक राज्यांत पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांवर पोहोचले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी झाले आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतरही विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हे आम्ही केलेल्या विरोधामुळेच झाल्याचं राष्ट्रवादीच्या आमदारानं म्हटलं आहे. तर, लालूप्रसाद यादव यांनीही जोरदार टीका केलीय.
केंद्र सरकारने केलेली पेट्रोल-डिझेल दरातील कपात ही सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक नाही. सरकारने पेट्रोल 50 रुपयांनी कमी करायला हवं होतं. हे न जुळणारं गणित आहे, कारण आणखी काही दिवसांनी ते पेट्रोल-डिझेलचे दर वाढवतील, असे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
#WATCH | RJD chief Lalu Prasad Yadav, reacting on reduction of central excise duty on petrol & diesel prices, says, "It is a mischievous move. The reduction (in fuel prices) should be Rs 50. It will give no relief (to the public). They would increase it again after some days." pic.twitter.com/LrY78GdPQA
— ANI (@ANI) November 3, 2021
महाविकास आघाडीच्या दणक्यामुळेच
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निर्णय केंद्र सरकारने आमच्या दणक्यामुळेच घेतल्याचे मिटकरी यांनी ट्विट केलंय. महाविकास आघाडीच्या दणक्यामुळेच पेट्रोल-डिझलेचा दरात कपात झाली. 'मविआच्या दणक्याने केंद्राला अखेर जाग, मविआ सरकारच्या एकजुटीचा विजय असो', असे ट्विट आमदार मिटकरी यांनी केलं आहे.
काँग्रेस म्हणतेय हा तर जुमलाच
काँग्रेस नेते आणि प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारच्या पेट्रोल दरकपातीच्या निर्णयाला जुमला म्हटलं आहे. तसेच, काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर असलेल्या उत्पादन शुल्काची आणि मोदी सरकारच्या काळातील उत्पादनक शुल्काची आकडेवारीच जाहीर केली आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील उत्पादन शुल्क पाहिल्या सध्याचे उत्पादन शुल्क पेट्रोलवर तिप्पट अधिक असल्याचे दिसून येते. तर, डिझेलवरही उत्पादन शुल्क 7 पटीने अधिक असल्याचे दिसून येते. त्यावरुनच, सुरजेवाला यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. ये जुमलेबाजी नही चलेगी, असं त्यांनी म्हटलंय.
कांग्रेस सरकार-:
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) November 3, 2021
पेट्रोल पर एक्साइज ड्यूटी - ₹9.48/लीटर
डीजल पर एक्साइज ड्यूटी - ₹3.56/लीटर
मोदी सरकार-:
पेट्रोल पर एक्साइज ड्यूटी -
₹32.90-5.00= ₹27.90/लीटर
डीजल पर एक्साइज ड्यूटी -
₹31.80-₹10.00= ₹21.80/लीटर
मोदी जी, जुमले नहीं चलेंगे,
जो आपने बढाया, वो सारा घटाओ। https://t.co/E2EN5aDvXc
स्वाती मालीवाल यांनी लगावला टोला
मोदी सरकारने उत्पादन शुक्लात कपात केल्यामुळे पेट्रोल 5 आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, हा पोटनिवडणूक निकालांचा परिणाम असल्याची खोचक टीका दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केली आहे. स्वाती यांनी ट्विट करुन, जनतेनं मोदी सरकारला दिलेल्या रिटर्न गिफ्टचा हा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.