ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - शत्रूच्या गोटात खळबळ उडवू शकेल. असे अजून एक संहारक अस्त्र भारताच्या शस्त्रागारात दाखल झाले आहे. ओदिशामधील अब्दुल कलाम द्विपावरून भारताने काल इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये मोठे यश मिळवले आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान मिळवणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे. याआधी हे तंत्रज्ञान केवळ अमेरिका, रशिया, चीन आणि इस्त्राइल या देशांकडेच होते.
पृथ्वी डिफेन्स व्हेइकल (PDV) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्राने चाचणीदरम्यान आपल्या लक्ष्याला आकाशात 97 किमी उंचीवर नष्ट केले. या चाचणीसाठी बंगालच्या उपसागरातून एका कृत्रिम बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले होते.