शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 17:34 IST

कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडवर आपले लक्ष वळवले आहे.

Congress Karnataka: भाजपच्या कार्यशैलितून धडा घेत काँग्रेसने कर्नाटकातील दणदणीत विजयानंतर लगेचच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यातील निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. 2014 नंतर भाजपमध्ये एक कार्यशैली विकसित झाली आहे, ज्या अंतर्गत कोणत्याही राज्याचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पक्ष इतर राज्यांवर लक्ष केंद्रित करू लागतो. 2014-2020 पर्यंत या कार्यशैलीनुसार पंतप्रधान मोदींसह अमित शहांनी उत्कृष्ट परिणाम दिले आहेत. या अंतर्गत पक्ष किमान सहा महिने अगोदर निवडणुकीची तयारी सुरू करतो.

कर्नाटकच्या धर्तीवर प्रचार होईलया वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीत सत्ता टिकवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे, तर मध्य प्रदेश पुन्हा काबीज करण्याचेही पक्षाने लक्ष्य ठेवले आहे. मध्य प्रदेशात, 2018 मध्ये ते जिंकले परंतु 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया गटातील 22 आमदारांनी पक्षांतर केल्यामुळे कमलनाथ सरकार कोसळले.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने 'कर्नाटक टेम्प्लेट'च्या धर्तीवर प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसाठी काँग्रेसने आखलेल्या योजनेत स्थानिक रणनीती, सकारात्मक प्रचार, मोफत भेटवस्तू, तिकिटांचे लवकर वाटप आणि काँग्रेसच्या विचारधारेवर भर, या प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याच वैशिष्ट्यांच्या बळावर काँग्रेस कर्नाटक निवडणुकीतही उतरली होती.

पक्ष बॅक टू बेसिक्सवर येणार काँग्रेस 'बॅक टू बेसिक्स' या उद्देशाकडे परतत असल्याचे दिसत आहे. विजयानंतर लगेचच सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांनी सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सिंग सुरजेवाला आणि इतरांसोबतचे फोटो शेअर करणे टाळले. नवनिर्वाचित आमदारांनी नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांना नव्हे तर काँग्रेस अध्यक्षांना अधिकार दिले. वरवर लहान वाटणार्‍या घटनेला मोठे महत्त्व आहे, कारण पूर्वी सोनिया गांधींना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नेते निवडण्याचे अधिकार देण्यात आले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा