गजवेल (जिल्हा मेदक, तेलंगण) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी मिशन भगीरथच्या पहिल्या टप्प्याचे उद््घाटन झाले. राज्यात प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी पाईपलाईनद्वारे पुरविण्याचा हा तेलंगण सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. गजवेल विधानसभा मतदार संघातील कोमतीबांदा (जिल्हा मेदक) खेड्यात मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. त्यांच्या हस्ते नळाची तोटी फिरविण्यात आली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव या मतदारसंघातून निवडून आले आहेत. याचवेळी मोदी यांच्या हस्ते हैदराबाद ते करीमनगर या १५२ किलोमीटर लांबीच्या मनोहराबाद-कोथापल्ली नव्या रेल्वमार्गाचा पायाभरणी समारंभ, राष्ट्रीय औष्णीक वीज महामंडळाच्या तेलंगणा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचा (टप्पा- १), वरंगल येथील रामगुंडम, कलोजी नारायण राव युनिव्हर्सिटी आॅफ हेल्थ सायन्सेस व रामगुंडम खत कारखान्याच्या कोनशिलेचे अनावरणही झाले. २०१४ मध्ये तेलंगण राज्याची स्थापना झाल्यानंतर मोदी यांची ही पहिलीच भेट होती. (वृत्तसंस्था)लक्ष्य मार्च २०१८मिशन भगीरथ ही ४० हजार कोटी रुपये खर्चाची योजना आहे. या योजनेद्वारे गजवेल विधानसभा मतदार संघातील ६७ हजार घरांना पिण्याचे शुद्ध पाणी पाईपलाईनद्वारे मिळेल. ग्रामीण भागात एका व्यक्तिला पिण्याचे १०० लिटर आणि शहरी भागात १५० लिटर पाणी देण्याचा प्रयत्न आहे. २०१८ पर्यंत हे पाणी देण्यात येईल.
‘मिशन भगीरथ’चे मोदींच्या हस्ते उदघाटन
By admin | Published: August 08, 2016 4:38 AM