नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशाला संबोधित करताना महत्त्वाची घोषणा केली आहे. भारताने अंतराळात आपलं नाव कोरलं असून अवकाश संशोधनात भारताला मोठ यश मिळाल्याचं सांगितले. भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं 300 किमी दूरवर असलेला उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. या घोषणेनंतर अनेकांनी डीआरडीओचे कौतुक केलं मात्र ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का केली इतकंच नाही तर मोदींनी निवडणुकीचा टाईमिंग साधला असल्याची टीका नेटीझन्सकडून व्यक्त करण्यात आली.
Mission Shakti: अहो मोदी, हे मिसाईल भाजपाने बनवलंय का?; ट्रोल झाले पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 7:56 PM