नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेवर(Covid 19 Vaccination) जोर दिला आहे. लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या मोबाईलवर प्रमाणपत्र पाठवलं जातं. परंतु अनेकदा प्रमाणपत्रात काही तरी चूक आढळते. जर तुमच्याही नावात, जन्मतारखेत चूक असेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. आरोग्य मंत्रालयाने प्रमाणपत्रात सुधारणा करण्याची सुविधा आणली आहे.
लाभार्थी आता कोविन(Cowin) पोर्टलवर जाऊन कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्रातील चूका सुधारू शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी बुधवारी सांगितले की, सरकारने कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्रातील चुका सुधारण्यासाठी कोविन(Cowin) अँपवर एक नवीन फिचर जोडले आहे. आरोग्य सेतू ट्विटर हँडलवर पोस्ट केल्याप्रमाणे आता तुम्ही कोविड प्रमाणपत्रात नाव, जन्मतारीख आणि जेंडर यातील चुका सुधारू शकता. या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला http://cowin.gov.in यावर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्रात दुरुस्ती असा नवा पर्याय समोर दिसेल.
या प्रकारे चूक सुधारा
लॉगिन केल्यानंतर रेज इन इश्यू वर तुम्हाला क्लिक करावं लागेल. हे फिचर लॉगिन केल्यानंतर राइड साइडला सर्वात वर दिसून येईल. ज्यानंतर तुम्हाला लाभार्थीचं नाव निवडावं लागेल. त्याचसह त्याच्या खाली करेक्शन इन सर्टिफिकेट बटण दाबावं लागेल. त्यानंतर खाली आल्यावर ३ पर्याय दिसतील. जेंडर आणि ईयर ऑफ बर्थ. यातील जी तुमच्या प्रमाणपत्रात चूक असेल तिला सिलेक्ट करा. यात १ अथवा ३ पर्यायात चुका सुधारण्यासाठी केवळ १ संधी मिळेल. म्हणजे जसं तुम्ही नाव निवडलं. त्यानंतर खाली येऊन बरोबर करून विविध कॉलम येतील. तेथे तुम्ही नाव, डेट ऑफ बर्थ अथवा जेंडर चुकीचं असेल ते बरोबर करू शकता.
७४ कोटी डोससाठी केंद्र सरकारने दिल्या ऑर्डर
देशातील संपूर्ण कोरोना लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने स्वत:कडे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या मोहिमेसाठी तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्राने या मोहिमेसाठी ७४ कोटी डोससाठी विविध कंपन्यांना ऑर्डर्स दिल्याची माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना लसीकरण मोहिमेत १८ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सोमवारी जाहीर केले होते. या मोहिमेबाबत अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली. सरकारकडे लसीकरणासाठी पुरेसा निधी असून, तत्काळ कुठल्याही पुरवणी निधीची गरज नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कदाचित दुसऱ्या टप्प्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुमारास गरज भासू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. लसीकरण मोहीम सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक आणि बायो-ई या कंपन्यांवर केंद्रित असून, बहुतांश लोकसंख्येला त्यातून लसी देता येतील, अशी अपेक्षा सूत्रांनी वर्तविली आहे.