ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - टाटा समूहाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आलेले सायरस मिस्त्री यांच्यावर टाटा सन्सने गंभीर आरोप केले आहेत. मिस्त्री यांनी टाटा ट्रस्टचा विश्वासघात केला असून, उद्योगसमूहातील प्रमुख कंपन्यांवर कब्जा करण्याचा आरोप केला आहे.
मिस्त्री यांना टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या अध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी इशात हुसेन यांची नियुक्ती केल्यानंतर काही तासांमध्येच टाटा सन्सने एक पत्रक काढून मिस्त्री यांच्यावर आरोप केले. मिस्त्री यांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. त्यांनी इतर सदस्यांना पद्धतशीरपणे बाहेरची वाट दाखवत संपूर्ण समूहाला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, असे टाटा सन्सने म्हटले आहे.
मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करताना टाटा उद्योग समूहाच्या 100 हून अधिक वर्षे जुन्या चौकटीस धक्के बसले आहेत. तसेच विविध कंपन्या आणि भागधारक उद्योग समूहापासून दूर जात आहेत. असेही टाटा ,सन्सने म्हटले आहे.