शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सासरच्यांवर दबावासाठी कायद्याचा दुरुपयोग: ओडिसा कोर्ट; नणंदेविरुद्धची कारवाई रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 8:19 AM

क्षुल्लक कारणांवरून वैवाहिक वादाचे खटले दाखल होत असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, कटक : पतीच्या कुटुंबावर दबाव आणण्यासाठी हत्यार म्हणून सासरच्या मंडळींविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा अनेकदा वापरला जातो, असे म्हणत ओडिशा हायकोर्टाने वेगळ्या घरात राहणाऱ्या तक्रारदाराच्या नणंदेविरुद्धची कारवाई रद्द केली. 

जून २०१७ मध्ये विश्वरूपा मोहंती यांच्या भावाचे लग्न झाले. २०१८ मध्ये वधूने आरोप केला की, हुंड्याच्या मागणीसाठी पती आणि इतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. भारतीय दंड विधान कलम ४९८-अ आणि हुंडाबंदी कायद्याच्या कलमांखाली पती आणि विश्वरूपासह सासरच्या इतर नातलगांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तपासानंतर दोषारोपपत्र दाखल केले.

विश्वरूपाने तिच्याविरुद्धचा गुन्हा चुकीचा आहे, ती विवाहित असल्याने वेगळ्या घरात राहते, या मुद्यावर  फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने म्हटले आहे की, कलम ४९८-अ अंतर्गत विवाहितेच्या छळाचा गुन्हा अनेकदा सासरच्या मंडळींविरुद्ध दबावतंत्र म्हणून दाखल केला जातो. अनेकदा अगदी दूरच्या ठिकाणी वेगळे राहणाऱ्या नातेवाइकांना गुन्ह्यांत ओढून दबाव आणला जातो, असे म्हणत विश्वरूपाविरुद्धची कारवाई रद्द केली. क्षुल्लक कारणांवरून वैवाहिक वादाचे खटले दाखल होत असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे

हे खरे आहे की हुंड्यासाठी छळाच्या खऱ्या प्रकरणात नवरा, सासू, नणंद, भावजय आणि सासरची इतर मंडळी महत्त्वाची भूमिका बजावतात. पती-पत्नीच्या वादाची प्रकरणे हाताळताना न्यायालयाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जेणेकरून खरा खटला व त्रास देण्यासाठी दाखल केलेला गुन्हा वेगळा करता येईल. - न्या. जी. सतपथी.

 

टॅग्स :Courtन्यायालय