ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - राज्यसभेवर नियुक्त असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर नियुक्त झाले होते. त्यांनी तब्येतीचे कारण पुढे करत राजीनामा दिला आहे.
मिथुन यांनी त्यांचे राजीनामापत्र राज्यसभेच्या सभापतींकडे सोपवल्याचे तृणमूल काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले. एप्रिल 2014 रोजी मिथुन यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. मात्र त्यांची सभागृहातील उपस्थिती नगण्य होती. गेल्या पावणेतीन वर्षांत ते केवळ तीन दिवस संसदेत उपस्थित राहिले होते. "मिथुन यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला असून, आमचे त्यांच्याशी आणि त्यांच्या परिवाराशी चांगले संबंध कायम राहतील," असे तृणमुलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले.
#FLASH Mithun Chakraborty resigns from the Rajya Sabha citing health issues— ANI (@ANI_news) 26 December 2016
He resigned from RS on health grounds;We continue to share warm relationship with him &his family;wish him speedy recovery-Derek O'Brien,TMC— ANI (@ANI_news) 26 December 2016