शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मिट्टी मे मिला देंगे; एन्काऊंटरनंतर CM योगींचा विधानसभेतील व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:46 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असद आणि मोहम्मद गुलाम झाशीतील परिछा धरणाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

झाशी: उत्तर प्रदेश एसटीएफने कुख्यात माफिया अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद व त्याचा साथीदार गुलाम या दोघांचा एन्काऊंटर करत त्यांना ठार केलं. झाशीमध्ये यूपी एसटीएफचे डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या दोघांचा खात्मा केला. पोलिसांनी त्यांच्याकडून परदेशी शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत. या घटनेनंतर देशभरात योगी सरकारच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू आहे. तर, सोसल मीडियावरही योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, त्यांनी मिठ्ठी मे मिला देंगे असे म्हणत इशारा दिल्याचे दिसून येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असद आणि मोहम्मद गुलाम झाशीतील परिछा धरणाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला, यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. त्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्या दोघांवर गोळीबार केला, यात दोघेही जागीच ठार झाले. युपी पोलिसांच्या या कारवाईमुळे योगी आदित्यनाथ याचं सरकार पुन्हा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी, मिट्टी मे मिला देंगें असे म्हणत युपीतील गुंडगिरीला इशाराच दिला होता. 

हे जे आरोपी आणि माफिया आहेत, त्यांना कोणी सांभाळलं होतं. ज्याच्याविरुद्ध एफआयआर आहे, त्यांना समाजवादी पार्टीने खासदार बनवलं नव्हत का? तुम्ही आरोपींचा सांभाळ कराल आणि तुम्हीच तमाशा कराल. पण, माफिया चाहे कोई भी हो, सरकार उसे मिठ्ठी मे मिला देगी, असे योगींनी  या व्हिडिओत म्हटले होते. योगींचा हा व्हिडिओ एक महिन्यापूर्वीचा असल्याचे समजते.  

अतिक अहमद ढसाढसा रडला

दरम्यान, माफिया अतिक अहमदला आज प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्याला त्याच्या मुलाचा एनकाउंटर झाल्याची माहिती देण्यात आली. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. उमेश पाल हत्येप्रकरणी असद आणि गुलाम हे दोघेही फरार होते. या दोघांवर यूपी पोलिसांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

अखिलेश यादव यांच्याकडून चौकशीची मागणी

खोटे एन्काऊंटर करुन भाजप सरकार खऱ्या मुद्द्यांपासून दूर पळत आहे. भाजपावाले न्यायालयावर विश्वासच करत नाहीत. आजच्या या एन्काऊंटरचा कसून तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली. तसेच,  भाजपा बंधुप्रेम जपण्याविरुद्ध आहे, चूक-बरोबर याचा निर्णय घेण्याचा अधिकार सत्तेचा नाही, असे म्हणत या एन्काऊंटवरच्या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.  

मुख्यमंत्र्यांकडून एसटीएफचे कौतुक 

उमेश पाल हत्याकांडातील फरार असद अहमद आणि शूटर गुलाम यांच्या एन्काऊंटरवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी बैठक बोलावली आहे. सीएम योगी यांनी यूपी एसटीएफ तसेच डीजीपी, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. प्रधान सचिव गृह संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना या चकमकीची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश