कोरोना व्हायरसचे (Corona Virus) संक्रमण रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम तीव्र करण्यात आली आहे. जवळपास 50 कोटींहून अधिक लोकांना लस मिळाली आहे. कोरोनाची लस घेतली तरी देखील कोरोनाचे संक्रमन होत आहे. तसेच कोरोनाची लाटही थोपविता येणार नाहीय, यामुळे कोरोनाविरोधात लोकांना सक्षम करण्यासाठी दोन लसींचे कॉकटेल करण्यावर आणि त्याच्या परिणामावर आयसीएमआर काम करत आहे. कॉकटेल एका लसीपेक्षा जास्त प्रभावी असल्याचे रिझल्टही हाती आले आहेत. यावर कोव्हिशिल्ड लस बनविणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांनी आपले मत मांडले आहे. (Cyrus Poonawalla talk on Covishield, covaxine Cocktail effect.)
‘डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल’, अशा थापा नेते मारत आहेत. महिन्याला १५ कोटी डोसचे उत्पादन करणे हे सोपे नाही. ते १५ कोटींपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. दर वर्षी ११०-१२० कोटी डोस देण्याचे आश्वासन आम्ही दिले. इतर कंपन्यांच्या लसींचे उत्पादनही सुरू आहे. या सगळ्यांची आकडेमोड करून किती डोस उपलब्ध होऊ शकतात, हे मोजता येऊ शकेल, अशा शब्दांत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक डॉ. सायरस पूनावाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
यानंतर त्यांनी कोरोना लसींच्या कॉकटेलवर आपले मत मांडले. कोरोना लसींचे दोन लसी एकत्र करून डोस देण्यात यावेत असे मला वाटत नाही. जर एका लसीचा डोस उपलब्ध नसेल तर दुसऱ्या लसीचा डोस देण्यात यावा. परंतू कॉकटेल नको, असे स्पष्ट मत पुनावाला यांनी मांडले. मी दोन लसी एकत्र करण्याविरोधात आहे. त्याची गरज नाहीय, असे सांगताना त्यांनी याची कारणेही सांगितली आहेत.
दोन कंपन्या एकमेकांविरोधात येतीलजर कॉकटेल लस दिली गेली आणि त्याचे परिणाम चांगले आले नाहीत, तर सीरम इन्स्टीट्यूट म्हणून शकते की दुसरी लस तेवढ्या ताकतीची नाही. याप्रकारे दुसरी कंपनी देखील सीरमच्या लसीला दोष देऊ शकते. हजारो लोकांवर याची चाचणी घेऊनही लसीचा परिणाम प्रभावी आहे की नाही हे सिद्ध झालेले नाही, असे पुनावाला यांनी सांगितले.