Mizoram Assembly Election Results : मुख्यमंत्र्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव, काँग्रेसची सत्ता गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:38 PM2018-12-11T16:38:38+5:302018-12-11T17:02:10+5:30
मिझोरमचे मुख्यमंत्री असलेल्या लाल थनहवला यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंफाई साऊथ आणि सेरछिप या दोन्ही मतदार संघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
नवी दिल्ली - मिझोरम (Mizoram Assembly Elections 2018) विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. मिझोरममध्ये काँग्रेसला पछाडत मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर दुसरीकडे मिझोरमचे मुख्यमंत्री असलेल्या लाल थनहवला यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंफाई साऊथ आणि सेरछिप या दोन्ही मतदार संघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक 34 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. तर मिझो नॅशनल फ्रंटने पाच जागांवर विजय मिळवला होता.
The Mizo National Front (MNF) emerged victorious in the Mizoram Assembly elections, bagging 24 seats out of the 40-member assembly, according to the latest figures by the Election Commission of India
— ANI Digital (@ani_digital) December 11, 2018
Read @ANI story | https://t.co/zMX0yif3Kopic.twitter.com/6LTwCnhomH
Mizoram Assembly Election Results : मिझो नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत, काँग्रेसला जनतेनं नाकारलं
Mizoram Assembly Election Results Live: मिझोरममध्ये पहिल्यांदाच भाजपाने उघडलं खातं https://t.co/5RaLiJbXZQ#MizoramAssemblyElections2018
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 11, 2018
निवडणुकीत मिझोरम पीपल्स कान्फरन्स, मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, मुख्य लढत मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान होत असून, यामध्ये आठ राजकीय पक्षांच्या एकूण 209 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे. या निवडणुकीसाठी मिझोरममध्ये एकूण 7,70,395 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात 374,496 पुरुष, 3,94,897 महिला मतदारांचा समावेश होता.
Assembly Election Results: गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिझोरममधील स्थिती