Mizoram Exit Poll 2023: देशात गेल्या काही दिवसांपासून पाच राज्याच्या निवडणुकींची जोरदार चर्चा सुरू आहे. आज गुरुवारी तेलंगणामध्ये मतदान होऊन पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्या. ईशान्येकडील राज्य मिझोरामचाही निवडणूक राज्यांमध्ये समावेश आहे. येथील ४० विधानसभेच्या जागेसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर वेगवेगळ्या एजन्सींनी मिझोरामसाठी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत.
तेलंगणात भाजपाच खरा खेळ करणार! बीआरएसची सत्ता जाणार? काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याचा अंदाज
माजी आयपीएस लालदुहोमा यांचा पक्ष झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. या पक्षाला जन की बातच्या एक्झिट पोलमध्ये १५-२५ जागा मिळताना दिसत आहेत. तर सत्ताधारी एमएनएफला १०-१४ जागा दाखविण्यात आल्या आहेत. काँग्रेसला ५-९ जागा मिळू शकतात. याशिवाय भाजपला ०-२ जागा मिळू शकतात.
इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्ये ZPM ला १२-१६ जागा मिळू शकतात असं दाखवलं आहे. तर सत्ताधारी एमएनएफला १४-१८ जागा दाखविण्यात आल्या आहेत. काँग्रेसला ८-१० जागा मिळू शकतात. याशिवाय भाजपला ०-२ जागा मिळू शकतात, असं दाखवलं आहे. त्यामुळे या राज्यात दोन स्थानिक पक्षच सत्तेसाठी झगडणार असल्याचे दिसत आहे.
मिझोरामचे एक्झिट पोल
ZPM -१२-१६
सत्ताधारी एमएनएफला- १४-१८
काँग्रेसला ८-१० जागा
भाजपला ०-२ जागा