राष्ट्रीय फळबाग मंडळाच्या संचालकपदी एम.के.अण्णा पाटील पत्रकार परिषद: केळी उत्पादकांच्या समस्या मार्गी लावणार
By admin | Published: August 20, 2016 10:21 PM
जळगाव : माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील यांची केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फळबाग मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. या संधीच्या माध्यमातून जिल्ातील केळी उत्पादकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जळगाव : माजी केंद्रीय मंत्री एम.के.अण्णा पाटील यांची केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फळबाग मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. या संधीच्या माध्यमातून जिल्ातील केळी उत्पादकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, फळबाग प्रक्रियेत १०० टक्के परदेशी गुंतवणुकीची संधी केंद्राने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मंडळाच्या वतीने फळबागशेती, फळबाग प्रक्रिया, प्रक्रियेतील उत्पादनाची बाजारपेठ, विभागाची ध्येय धोरणे, निधी, समन्वय व विकासाची कामे केली जातात. फळे प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहेत. यात ग्रामीण महिलांना मोठी संधी लाभणार आहे. जळगाव जिल्ात केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. केळीला फळाच्या दर्जाचा विषय वादातीत आहे. केळी उत्पादकांना याप्रश्नी मदत केली जाईल, असेही एम.के.अण्णा पाटील म्हणाले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, सदाशिव पाटील, कैलास सूर्यवंशी, बंडू पगार, अशोक भोसले व विशाल पाटील उपस्थित होते.