बिहारसाठी उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्या बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यामुळे आता बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय पेच वाढला आहे. सर्वच पक्षांनी आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसापासून उलथापालथ सुरू आहे, काही दिवसापूर्वीच नितीश कुमार यांनी एनडीएसोबत जात सरकार स्थापन केले, आता या सरकारची उद्या सोमवारी बहुमत चाचणी होणार असून याचे चित्र २४ तासांत स्पष्ट होईल.
बहुमत चाचणीपूर्वी RJD आपल्या आमदारांवर लक्ष ठेवून आहे. यासाठी तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना त्यांच्या घरी ठेवले आहे. सर्व आमदार त्यांच्या निवासस्थानी मुक्कामी आहेत. दरम्यान, आरजेडी आमदार अख्तरुल इस्लाम शाहीन यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.ख्तरुल इस्लाम शाहीन म्हणाले की, जर व्हिप जारी केला नाही तर २०० आमदार तेजस्वी यादव यांच्या समर्थनार्थ उभे राहतील', असं वक्तव्य त्यांनी केले.
भाजपा देशातील सर्वांत श्रीमंत पक्ष, इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले 1300 कोटी, तर काँग्रेसला...
आमदार अख्तरुल इस्लाम म्हणाले की, फक्त आरजेडीच नाही तर जेडीयू आणि भाजपच्या आमदारांचाही तेजस्वी यादव यांच्यावर विश्वास आहे. तेजस्वी यादव यांच्यावर आमदारांचे आकर्षण आहे असा विश्वास आहे. जर व्हिप जारी केला नाही तर २४३ सदस्यांच्या सभागृहात २०० आमदार तेजस्वी यादव यांना पाठिंबा देतील. ते लोक तेजस्वी यादव यांना ओळखतात आणि त्यांचे काम पाहिले आहे.
रविवारी RJD आमदार आणि महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली. त्यानंतर सर्व आमदारांना तेजस्वी यांच्या निवासस्थानी थांबवण्यात आले. फ्लोअर टेस्ट होईपर्यंत सर्व ७९ आमदार त्यांच्या निवासस्थानी राहतील. या काळात आमदारांना फोन न वापरण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.
काँग्रेसचे १७ आमदार हैदराबादमध्ये आहेत, तर भाजपचे आमदार बोधगयामध्ये आहेत. फ्लोअर टेस्टपूर्वी सर्वच पक्ष चिंतेत असल्याने सर्वच पक्ष आमदारांना वाचवण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, जनता दल युनायटेड आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाने त्यांच्या आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना एनडीएच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले आहे.
बहुमतासाठी १२२ आमदारांचा पाठिंबा
१७ महिने एकत्र राहिल्यानंतर नितीश कुमार महाआघाडी सोडून पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर २८ जानेवारीला नितीश कुमार यांनी बिहारचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२२ आहे. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ आमदारांचा पाठिंबा लागणार आहे.
नितीश कुमार यांनी १२८ आमदारांच्या पाठिंब्याची चर्चा केली आहे. त्यांच्याकडे बहुमतापेक्षा फक्त ६ आमदार जास्त आहेत, तर महाआघाडीकडे ११५ आमदार आहेत, त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी ७ आमदारांची गरज आहे. आता सारा खेळ या सात आमदारांवर अवलंबून आहे जे राज्यात मोठा बदल घडवू शकतात.