आमदारांचे 'काँग्रेस छोडो, भाजप जोडो' अभियान, पक्षानं दिली अशी प्रतिक्रीया; AAP म्हणतंय RIP
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 15:25 IST2022-09-14T15:25:19+5:302022-09-14T15:25:54+5:30
यावेळी, काँग्रेस सोडून भाजपत जाणारे मायकल लोबो म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हातांना बळकटी देण्यासाठी आम्ही भाजपत प्रवेश केला आहे.' त्यांनी 'काँग्रेस छोडो और भाजप जोडो', अशी घोषणाही दिली.

आमदारांचे 'काँग्रेस छोडो, भाजप जोडो' अभियान, पक्षानं दिली अशी प्रतिक्रीया; AAP म्हणतंय RIP
गोव्यात काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. येथे आठ आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकत सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आता काँग्रेसकडे येथे केवळ तीनच आमदार शिल्लक उरले आहेत. यातच, काँग्रेस पक्षाचे नेते पवन खेरा यांनी निदा फाजलीच्या एका कवितेचा आधार घेत हे भाजपचे 'ऑपरेशन कीचड' असल्याचे म्हटले आहे. आम आदमी पार्टीनेही यावरून निशाणा साधला आहे.
पवन खेरा ट्विट करत म्हणाले, ''ऐकले आहे की भारत जोडो यात्रेमुळे गडबडलेल्या भाजपने गोव्यात 'ऑपरेशन किचड' सुरू केले आहे.'' याच ट्विटमध्ये खेरा यांनी निदा फाजलींची एक कविता शेअर करत, 'सफर में धूप तो होगी जो चल सको तो चलो...,' असेही म्हटले आहे. एवढेच नाही, तर ''जे भारत जोडण्याच्या या कठीन कामात साथ देऊ शकत नाहीत, ते भाजपच्या धमक्यांना घाबरून तोडणाऱ्यांकडे जात असतील, तर हेही समजून घ्या, की भारत पाहत आहे.''
यावेळी, काँग्रेस सोडून भाजपत जाणारे मायकल लोबो म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हातांना बळकटी देण्यासाठी आम्ही भाजपत प्रवेश केला आहे.' त्यांनी 'काँग्रेस छोडो और भाजप जोडो', अशी घोषणाही दिली.
यातच, आम आदी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी ट्विट करत, 'ऑपरेशन लोटस पंजाब आणि दिल्लीत फेल झाले, मात्र, गोव्यात यशस्वी ठरले. असे का झाले? कारण, आपण जेव्हा काँग्रेसला मतदान करता, तेव्हा भविष्यातील भाजप आमदार निवडतात. काँग्रेस संपला आहे. RIP'