राजस्थानमध्ये मध्य प्रदेशसारखाच सत्तासंघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी आमदारांसोबत दिल्लीत ठाण मांडल्याने गेहलोत सरकार अडचणीत आले आहे. आता सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमदारांनाच हजर होण्याचा आदेश सोडला आहे.
सकाळी 10 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री, आमदारांची लगबग सुरु झाली आहे. गेहलोत यांनी काँग्रेसच्या आमदारांना असाल तिथून निघून या आणि जयपूरला पोहोचा, असे आदेश दिले आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी मला भेटण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानी यावे, असेही आमदारांना कळविण्यात आले आहे.
राजस्थानचे परिवाहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी सांगितले की, गहलोत यांनी आज कॅबिनेटची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कोणत्याही काँग्रेस आमदाराचा फोन बंद लागल्यास किंवा तो न सापडल्यास घाबरू नका. त्याच्याकडे जाऊन संपर्क साधा. सरकारला वाचविण्याची जबाबदारी आता सर्वांची आहे, असे आदेश दिले आहेत.
कपिल सिब्बल यांचे ट्विटमध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष पहायला मिळत असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंचा व्यक्त केली आहे. आपल्या पक्षासाठी चिंतेत आहे. घोडे तबेल्यातून निघून गेले की आम्ही जागे होणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. यामध्ये त्यांनी राजस्थानचा उल्लेख केलेला नसून मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे, आता सचिन पायलट असे तरुण नेते काँग्रेस गमावत असल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाने यावर मौन धारण केल्याने सिब्बल यांनी बोट दाखविले आहे.
पायलटांचा आरोपराजस्थानमध्ये सचिन पायलट उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी अहमद पटेल यांची भेट घेत गेहलोत यांच्यावर आरोप केला आहे की, आम्हाला गेहलोत बाजुला ठेवत आहेत. यावर पटेल यांनी पायलटना तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे गेहलोत वरिष्ठ नेत्यांना राज्यात सारेकाही ठीक असल्याचे सांगत आहेत. दरम्यान पायलट यांना राजस्थानच्या एसओजीने चौकशीसाठी बोलावले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार
हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली
मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक
अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज
Ganeshotsav 2020 : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन
परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार