ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 - बँक बदलली तरी नव्या बँकेत खाते क्रमांक कायम ठेवण्याची सुविधा लवकरच खातेधारकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोबाईल नंबर ज्याप्रमाणे पोर्टेबल करता येतो. त्याचप्रमाणे आता बँक अकाउंटही नंबर पोर्टेबिलिटी करण्याता प्रस्ताव आरबीआयने ठेवला आहे. डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांनी ही माहिती दिली आहे. बँकिंग कोड्स अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.बँकिंग क्षेत्रातील हे खूप मोठं पाऊल मानल जात आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे एखाद्या नव्या बँकेत खातं उघडण्यासाठी परत सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याच्या व्यापातून ग्राहकांची सुटका होणार आहे. जुना अकाऊंट नंबर कायम ठेवून ग्राहक नव्या बँकेत अकाऊंट उघडू शकतील. तांत्रिक अत्याधुनिकीकरण आणि आधार कार्डशी बँकेचं खातं जोडून ग्राहकांना ही सुविधा सहज उपलब्ध करून देता येईल, असे एस.एस. मुंद्रा यांनी यावेळी स्पष्ट केले.उदा. तुमचं कॅनरा बँकेत एक अकाउंट आहे. पण तुम्हाला तुमचं हे अकाउंट एसबीआय (रइक) मध्ये हवं असल्यास तुम्ही ते पोर्टेबिलिटीनं करता येणार आहे. तुमचा कॅनरा बँकेतील अकाउंटनंबर तुम्हाला एसबीआयमध्ये मिळेल. म्हणजेच तुमची बँक बदेलल पण तुमचा अकाउंट नंबर तोच राहिल.बँक अकाउंट नंबरला पोर्टेबिलिटी देणं सोपं काम नाही. यासाठी बँकांना आपला डेटा ऑनलाइन आणावा लागेल. तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं अधिक सक्षम व्हावं लागेल. त्यामुळे बँका हा प्रस्ताव स्वीकारतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मोबाईल नंबर प्रमाणे बँक अकाऊंटही होणार पोर्टेबल
By admin | Published: May 31, 2017 5:05 PM