चेन्नई : तामिळनाडूतील सर्व मंदिरांमध्ये माेबाइल फाेनवर बंदी घालण्यात आली आहे. मद्रास हायकोर्टाने हा निर्णय घेतला आहे. मंदिरांची शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले.
सुब्रमण्यम स्वामी मंदिरात माेबाइल फाेनवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली हाेती. माेबाइल फाेनमुळे लाेकांचे लक्ष विचलित हाेते. तसेच मंदिरांमध्ये देवी-देवतांचे फाेटाे काढणे परंपरेच्या विरुद्ध आहेत. तिरुचेंदूर येथे मंदिर प्राधिकरणाने माेबाइल फाेनवर बंदी घातली असून ड्रेसकाेडही लागू केला आहे, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर हायकोर्टाने संपूर्ण राज्यात माेबाइल बंदीचे आदेश दिले. हायकोर्टाने मंदिरांमध्ये माेबाइल फाेन जमा करण्यासाठी लाॅकर्स बनविण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची सूचनाही केली आहे.
मंदिरांच्या सुरक्षेला धोका फाेटाे काढल्यामुळे मंदिरातील सुरक्षादेखील धाेक्यात येऊ शकते. महिलांची छायाचित्रे विनापरवानगी काढली जातात, हा मुद्दाही याचिकेत उपस्थित केला हाेता.