ऑनलाइन लोकमत -
सुरत, दि. ५ - पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या कारागृहाबाहेरुन मोबाईल फोन सापडल्याची माहिती समोर आली आहे. हार्दीक पटेल सध्या लाजपोर कारागृहात आहे. पटेलच्या कारागृहाबाहेर 2 मोबाईल फोन, चार्जर्स आणि फोनची बॅटरी सापडली आहे.
कारागृहातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तुरुंग अधिका-यांना तपासणी करताना हार्दीक पटेलच्या तुरुंगाबाहेर शुक्रवारी एक मोबाईल सापडला होता. त्यानंतर केलेल्या तपासणीत अजून एक मोबाईल हॅण्डसेट, मोबाईल बॅटरी आणि 2 चार्जर सापडले. तुरुंग अधिकारी डी पी रबारी यांनी सचिन पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. उपअधीक्षक व्ही डी पाटील यांनी पोलीस तपास करत असल्याची माहिती दिली आहे.