नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे झालेल्या एका बैठकीत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीच्या कामाचा आढावा घेतला आणि लाभार्थीची निवड करण्याच्या बाबतीत या निधीने ‘गुजरात मॉडेल’चे अनुकरण करून गरीब मुलांना मदत देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले.
पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार पंतप्रधान निधीचे काम अधिक लोकाभिमुख होण्यासाठी मोदी यांनी अनेक गुणात्मक सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.
या संदर्भात गुजरातमधील मुख्यमंत्री निधीच्या कामकाज पद्धतीचा उल्लेख करून पंतप्रधानांनी असे आदेश दिले की, या निधीमधून मदत द्यायच्या लाभार्थीची निवड अधिक र्सवकष, शास्त्रशुद्ध व मानवतावादी पद्धतीने करण्यात यावी. तसेच मदत देताना लहान मुले, गरीब आणि सरकारी इस्पितळांमधील रुग्णांच्या प्रकरणांना प्राधान्य दिले जावे.
प्राणघातक आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची प्रकरणो गरज व गुणवत्ता या निकषांवर प्राधान्यक्रमाने निकाली काढावीत, असेही मोदी यांनी सांगितल्याचे या पत्रकात नमूद केले गेले. मदतीसाठी आलेले अजर्प्रलंबित राहण्याचा काळ कमीत कमी केला जावा व खरोखरचे गरजू वगळले जाणार नाहीत, अशा पद्धतीने मदत द्यायच्या प्रकरणांची निवड केली जावी, यावरही पंतप्रधांनी भर दिला.
निवड केलेल्या लाभार्थीना मदतीची रक्कम पाठविताना सोबत पंतप्रधानांच्या वतीने त्यांना एक पत्रही पाठविले जावे आणि मदतीसाठी निवड झाल्यावर संबंधित लाभार्थीला ‘एसएमएस’ पाठवून तसे कळविले जावे, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारताच्या फाळणीमुळे विस्थापित होऊन 1948 मध्ये पाकिस्तानातून आलेल्या निवार्सितांना मदत करण्याच्या प्रमुख उद्देशाने पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीची लोकवर्गणीतून स्थापना करण्यात आली.
आता या निधीतील रकमेचा वापर महापूर, वादळ व भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्युमुखी पडणा:यांच्या कुटुंबियाना तातडीने मदत देण्यासाठी व भीषण अपघात अथवा दंगलींमधील मृतांच्या वारसांना तातडीची मदत देण्यासाठी केला जातो.
याखेरीज हृदय शस्त्रक्रिया व मूत्रपिंड प्रत्यारोपण यासारख्या शस्त्रक्रिया कर्करोगावरील उपचारांसाठीही पंतप्रधान निधीतून मदत दिली जाते.