शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
3
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
4
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
5
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
6
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
7
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
8
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
9
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
10
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
11
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
12
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
13
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
15
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
16
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
17
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
18
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
19
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
20
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे 'हे' गाव; घरांमध्ये वीज बिल येतंय झिरो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 8:51 PM

solar powered village : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आगामी गुजरात दौऱ्यात 9 ऑक्टोबर रोजी मोढेरा हे चोवीस तास BESS सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करणार आहेत.

मोढेरा : सूर्य मंदिरासाठी जगप्रसिद्ध असलेले गुजरातचे मोढेरा आता देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव बनणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आगामी गुजरात दौऱ्यात 9 ऑक्टोबर रोजी मोढेरा हे चोवीस तास BESS सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करणार आहेत.

मोढेराच्या या सौरऊर्जा प्रकल्पाविषयी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले, "मला आनंद आहे की, स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्मितीचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुजरातने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेद्वारे भारताच्या 50 टक्के ऊर्जा गरजा पूर्ण करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."

भारत सरकार आणि गुजरात सरकारने मेहसाणा येथील सुजानपुरामध्ये बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) सह एकीकृत सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे, जो सूर्य मंदिरापासून फक्त 6 किमी अंतरावर आहे. मोढेराला 24x7 सौर उर्जेवर आधारित वीज देण्यासाठी 'सोलरायजेशन ऑफ मोढेरा सन टेम्पल अँड टाउन' हा उपक्रम सुरू केला. या प्रकल्पाच्या विकासासाठी गुजरात सरकारने 12 हेक्टर जमीन दिली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त योजनाया प्रकल्पासाठी भारत सरकार आणि गुजरात सरकारद्वारे दोन टप्प्यांमध्ये 50:50 च्या आधारावर संयुक्तपणे 80.66 कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच फेज-1 मध्ये 69 कोटी रुपये आणि फेज-2 मध्ये 11.66 कोटी रुपये. सौरऊर्जेपासून वीजेची सुविधा देण्यासाठी मोढेरा येथील 1300 घरांमध्ये प्रत्येकी एक किलोवॅट क्षमतेची सोलर रूफटॉप सिस्टीम बसवण्यात आली आहे. या सौर पॅनेलद्वारे दिवसा आणि संध्याकाळी BESS म्हणजेच बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमद्वारे वीज पुरवठा केला जाणार आहे.

हा प्रकल्प विशेष का आहे?- या प्रकल्पाद्वारे शुद्ध अक्षय ऊर्जा उत्पादक बनणारे मोढेरा हे भारतातील पहिले गाव ठरले आहे.- हे असे पहिले आधुनिक गाव आहे, ज्यामध्ये सौर-आधारित अल्ट्रा-मॉडर्न इलेक्ट्रिक व्हीकल चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध आहे.- भारतातील पहिली ग्रिड कनेक्टेड MWh स्केल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम स्थापित करण्यात आली आहे.- येथील स्थानिक लोक निवासी वीज बिलावर 60 टक्के ते 100 टक्के बचत करत आहेत.

आकर्षक रोषणाईचा आनंद घेता येणारजगप्रसिद्ध मोढेरा सूर्यमंदिरात सौरऊर्जेवर चालणारे 3-डी प्रोजेक्शन पर्यटकांना मोढेराच्या समृद्ध इतिहासाची माहिती देईल. हे 3-डी प्रक्षेपण दररोज संध्याकाळी 7:00 ते 7:30 पर्यंत केले जाईल. याशिवाय, मंदिराच्या सुशोभिकरणासाठी सौरऊर्जेवर चालणारी हेरिटेज लायटिंगही मंदिराच्या आवारात लावण्यात आली आहे. दररोज संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत प्रेक्षकांना या आकर्षक रोषणाईचा आनंद घेता येईल.

वीज बिल येतंय झिरोकेंद्र आणि राज्याच्या या प्रकल्पामुळे आम्ही ग्रामीण भागातील लोक खूप आनंदी आहोत. पूर्वी एक हजार रुपयांच्या आसपास वीज बिल येत असे, मात्र आता ते जवळपास शून्य झाले आहे. कोणत्याही खर्चाशिवाय सर्व लोकांच्या घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. या सोलर पॅनलद्वारे जेव्हा आपल्या गरजेपेक्षा जास्त ऊर्जेची बचत होते, तेव्हा सरकार आम्हाला त्यासाठी अतिरिक्त पैसेही देते, असे मोढेरा गावच्या सरपंच जतनबेन डी. ठाकोर यांनी सांगितले.

टॅग्स :GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदी