बंगळुरु - पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मोदी केवळ ‘स्पीकर’ आणि ‘एअरप्लेन’ मोडवर आहेत. ते कधीही वर्क मोडचा वापर करीत नाहीत, असा जोरदार टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात प्रचार करताना लगावला.मतदानाला आता अवघे चार दिवस उरले असताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या काळात झालेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी कोलार येथे सायकल आणि बैलगाडीतून प्रवास केला. प्रचारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी २०१४ च्या निवडणुका जिंकल्यापासून मोदी यांनी केलेल्या कामांचा जाब मागितला. मोदी यांनी इंधन दरवाढीच्या नावाने जनतेची लूट सुरू केली आहे. या सरकारने या लुटीतून १० लाख कोटी कमावल्याचा टोलाही त्यांनी लागवला.भाजपाचा पलटवार- राहुल गांधी यांनी ‘एंटरटेन्मेंट मोड’वर असल्याचा पलटवार भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल राव यांनी केला.-अनेक जण केवळ मनोरंजनाच्या राहुल यांच्या रॅलीमध्ये सहभागी होतात, अशी टीकाही त्यांनी केली.आधुनिक तंत्रज्ञानाला विरोधीपक्षांचा विरोध - नरेंद्र मोदींची टीकाआधार कार्ड असो किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (इव्हीएम) या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त गोष्टींना विरोधक सातत्याने विरोध करीत असल्याचीटीका पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी केली. मात्र कौशल्यविकास व संशोधन यांना प्राधान्य देऊन त्यांच्या आधारे भाजपला आधुनिक भारत घडवायचा आहे, असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून ते भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.2560 एकूण उमेदवार रिंगणात391 फौजदारी गुन्हा असलेलेपाच वर्षांचा कारावासभाजपा उमेदवारांपैकी ५८ जणांवर गंभीर स्वरुपाचे फौजदारी गुन्हे आहेत. या गुन्ह्यात ते दोषी आढळल्यास कमीतकमी पाच वर्षांचा कारावास होऊ शकतो. काँग्रेसच्या ३२ जणांवर व जनता दल (सेक्युलर)च्या २९ जणांवर गंभीर स्वरुपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत.३९१ उमेदवारांवर फौजदारी गुन्हा; भाजपा आघाडीवरकर्नाटकमध्ये १२ मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकांतील एकुण उमेदवारांपैैकी ३९१ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. काँग्रेस, भाजप, जनता दल (सेक्युलर) या महत्वाच्या पक्षांच्या एकुण उमेदवारांपैैकी २४% उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल असून त्यांची संख्या भाजपमध्ये सर्वाधिक म्हणजे ८३ इतकी आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेने हा अहवाल दिला आहे.
मोदी एअरप्लेन मोडवर, वर्क मोड नाहीच - राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 1:58 AM