शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

उत्तर प्रदेशातील परिस्थितीवर मोदी नाराज, योगींकडे केली विचारणा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 1:32 PM

केंद्र आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपासाठी सध्याचा काळा कसोटीचा ठरत आहे. नुकत्याच झालेल्या गोरखपूर आणि फूलपूर येथील पोटनिवडणुकीतील पराभव आणि चार खारदारांनी पाठवलेली तक्रार पत्रे यांची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून

नवी दिल्ली - केंद्र आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपासाठी सध्याचा काळा कसोटीचा ठरत आहे. अॅस्ट्रोसिटीवरील निकालावरून देशभरातील दलितांमध्ये वाढलेल्या नाराजीने भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची चिंता वाढवली आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या गोरखपूर आणि फूलपूर येथील पोटनिवडणुकीतील पराभव आणि चार खारदारांनी पाठवलेली तक्रार पत्रे यांची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचारणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये परिस्थितीती बिघडत का चालली आहे, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. त्याआधी योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी दिल्ली दौऱ्यादरम्यान भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी शाह यांनी काही मुद्द्यांवर उत्तर प्रदेश सरकारला आलेल्या अपयशावरून आदित्यनाथांकडे नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, 11 एप्रिलला अमित शाह लखनौला भेट देणार आहेत. त्यावेळी ते उत्तर प्रदेशमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरएसएसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यानंतर मोदी आणि शाह यांनी आदित्यनाथ यांच्याकडून राज्यातील परिस्थितीबाबत स्पष्टीकरण मागवले आहे.   योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  अमित शाह यांच्यातील चर्चा ही नियमित चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पक्षांतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार या भेटीचा परिणाम लवकरच दिसणार असून, सरकार आणि संघटनेत काही बदल दिसून येणार आहेत. सपा आणि बसपा यांच्यातील एकीमुळे मुस्लिम आणि दलित मतांची भाजपाविरोधात एकजूट होण्याच्या शक्यतेवरून आरएसआरने भाजपाला इशारा दिला होता. त्यामुळे चिंता वाढलेल्या मोदी आणि अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावून घेतले होते.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण