शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

"मोदी बाबू, बंगाल जळाला तर दिल्लीच्या खुर्चीला हादरे बसतील", ममता बॅनर्जींचा इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:04 PM

Mamata Banerjee Warns Narendra Modi: काल भाजपाने पुकारलेल्या बंगाल बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या संतप्त झाल्या आहेत.त्यांनी बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोलकात्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून, विरोधकांकडून ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच या घटनेविरोधात काल भाजपाने पुकारलेल्या बंगाल बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या संतप्त झाल्या आहेत.त्यांनी बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपाने पुकारलेल्या भारत बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीवरून ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, काही लोकांना वाटतंय की हा बांगलादेश आहे. मला बांगलादेश आवडतो, तिथले लोक आमच्यासारखंच बोलतात. बांगलादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे. मात्र बांगलादेश हा वेगळा देश आहे आणि भारत हा वेगळा देश आहे, हे लक्षात ठेवा.  मोदी बाबू तुम्ही तुमच्या पक्षाला सांगून आग लावत आहात. लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर आसाम गप्प बसणार नाही. पूर्वोत्तरेतील राज्यही शांत राहणार नाहीत. तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि ओदिशाही शांत राहणार नाही. दिल्लीसुद्धा शांत राहणार नाही. तुमची खुर्ची हलवून टाकू, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनी आयोजित एका सभेमध्ये केलं. ममता बॅनर्जींच्या विधानानंतर बंगालमधील वातावरण तापलं आहे. तसेच भाजपाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

बदला नाही तर बदलाची आपली जुनी घोषणा विसरून ममता बॅनर्जी ह्या विरोधी पक्षांना धमकावण्याचं काम करत आहेत, असा आरोप भाजपाने केला. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सुकांत मुजुमदार यांनी ममता बॅनर्जी यांनी केलेलं विधान धमकीपूर्ण असल्याची टीका करत त्याचा निषेध केला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहून ममता बॅनर्जी ह्या महत्त्वाच्या पदावर राहण्यासाठी पात्र राहिल्या नसल्याचे सांगितले. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या विधानावर ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही टीका केली. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा