छच्च्अकरा : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या घाना, आयव्हरी कोस्ट आणि नामिबिया या आफ्रिकी देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीही काही आफ्रिकी देशांना भेट देऊ शकतात. घानातील भारतीय उच्चायुक्त के. जिवा सागर यांच्या वतीने आयोजित स्वागत समारंभात मुखर्जींनी सोमवारी भारतीय लोकांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी मोदींच्या संभाव्य दौऱ्याचे संकेत दिले. आफ्रिकी देशांसोबतच्या भारताच्या जुन्या मैत्रीला उजाळा देत राष्ट्रपती म्हणाले की, काळानुरूप हे नाते अधिक बळकट होत गेले. गेल्यावर्षी नवी दिल्लीत मोदींनी भारत आफ्रिका मंचाच्या शिखर परिषदेचे आयोजन केले होते.
राष्ट्रपतीनंतर जाणार मोदी आफ्रिकी देशांत
By admin | Published: June 15, 2016 3:56 AM