हरीश गुप्तानवी दिल्ली : हजारो कोटींचा घोटाळा करणा-या नीरव मोदीकडून रोखीने हिरे व दागिन्यांची खरेदी करणाºया ५०० जणांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. सीबीआयने मोदी व चोकसी यांच्याशी संबंधित पाच जणांना अटक केली असून, त्यात विपुल अंबानी याचाही समावेश आहे.महाघोटाळ्यानंतर सीबीआय, ईडीने धाडी घातल्यानंतरच प्राप्तिकर खात्याने नोटिसा पाठविल्या आहेत. प्राप्तिकर खात्याने काळा पैसाविरोधी कायद्याद्वारे मोदीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यामुळे अर्थमंत्रालयाने रिझर्व्ह बँकेकडे व्यवस्थेच्या अपयशाबद्दल तपशील मागविला आहे. हा घोळ नजरेतून कसा सुटला, असे अर्थ खात्याने विचारले आहे. या प्रकाराच्या चौकशीसाठी आरबीआयने माजी सदस्य वाय. एच. मालेगम यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली आहे. 'या घोटाळ््याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदाच मौन सोडले. घोटाळेबाजांना पकडल्याशिवायराहणार नाही. बँकिंग व्यवस्थेत छेडछाडीला रोखण्यात बँक प्रशासनला अपयश आले, असा ठपकाही जेटली यांनी ठेवला.सोने-दागिन्यांची जी खरेदी झाली, ती हिशेबवह्यांमधील नोंदीपेक्षा अधिक होती. याबद्दल प्राप्तिकर खात्याने विचारणा केली, पण तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नव्हता. नीरव मोदी याच्या कंपनीचा २०१३-१४ या कालावधीत मॉरिशस व सायप्रस येथील कंपन्यांशी शेअर कॅपिटल व शेअर प्रीमियम स्वरूपात २८४ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्याचीही चौकशी आता प्राप्तिकर खाते करणार आहे.
मोदीकडून हिरे खरेदी; ५00 ग्राहक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:10 AM