शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मोदी गुजरातमध्ये आमच्यासोबत जे करत होते तेच दिल्लीत करत आहेत - जिग्नेश मेवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 6:18 PM

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही दलित नेता व गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आणि त्यांचे समर्थक राजधानी दिल्लीच्या संसद मार्गावर 'युवा हुंकार रॅली' करत आहेत.

नवी दिल्ली : पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही दलित नेता व गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आणि त्यांचे समर्थक राजधानी दिल्लीच्या संसद मार्गावर 'युवा हुंकार रॅली' करत आहेत. रॅलीच्या पार्श्वभुमीवर दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातला अहमदाबादमध्ये यायचे त्यावेळी आम्हाला ताब्यात घेतलं जात होतं. आज आम्ही दिल्लीत आलोय तर येथेही आमच्यासोबत तेच करत आहेत', असं मेवाणी यावेळी म्हणाले. 

'या सरकारमध्ये भ्रष्टाचार, गरिबी , रोजगार यांसारख्या महत्वाच्या मुद्दयांना बगल देवून गोहत्या , घरवापसी , लव-जिहाद या मुद्द्यांना जास्त महत्व दिलं जात आहे, आमचा त्यालाच विरोध आहे' असं मेवाणी यावेळी बोलताना म्हणाले. 

यापूर्वी जंतर-मंतरच्या दिशेनं जात असताना जिग्नेश मेवाणी यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रॅलीला परवानगी नाकारणं ही बाब  दुर्दैवी आहे. आम्ही तर केवळ लोकशाही व शांततापूर्ण मार्गानं निदर्शनं करणार आहोत. सरकार आम्हाला टार्गेट करत आहे.  एका लोकप्रतिनिधीला बोलण्यापासून अडवण्यात येत आहे'. तर दुसरीकडे, जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.  शिवाय, निदर्शनं केल्यास कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  

डीसीपींचं ट्विट-एनजीटीच्या (राष्ट्रीय हरित लवादा) आदेशानुसार आतापर्यंत संसद मार्गावर प्रस्तावित निदर्शनास दिल्ली पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही, असे ट्विट नवी दिल्लीचे डीसीपींकडून सोमवारी रात्री उशीरा करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना दुस-या ठिकाणी निदर्शनं करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, मात्र यास आयोजकांनी तयारी दर्शवलेली नाही. जिग्नेश मेवाणी-उमर खालिदविरोधात गुन्हा-दरम्यान, पुण्यामध्ये ३१ डिसेंबर रोजी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मेवानी म्हणाले होते की, उना येथील प्रकरण असो की, कोरेगाव भीमाचे असो, मोदी याबाबत शब्दही बोलले नाहीत. गुजरातमध्ये भाजपाच्या जागा 99 पर्यंत कमी झाल्यानंतर भाजप व संघ मला लक्ष्य करीत आहेत. निवडून आलेल्या दलित नेत्याला अशी वागणूक दिली जात असेल तर, देशातील गरीब दलितांची काय अवस्था असेल, याची कल्पना केली जाऊ शकत नाही. या लोकांना सुरक्षित कसे काय वाटू शकेल?'मोदींनी मौन सोडावं'-कोरेगाव भीमाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावं, नाहीतर याचा परिणाम 2019 मध्ये दिसून येईल, असा इशारा देत मेवाणीनं हुंकार युवा रॅली काढणार असल्याचं सांगितले होते. 5 जानेवारीला पत्रकार परिषद घेत मेवाणीनं हा इशारा दिला होता. यावेळी पंतप्रधान कार्यलयात जाऊन एका हातात मनुस्मृती आणि एका हातात संविधान घेऊन जाणार आणि या दोन्हींपैकी कशावर विश्वास ठेवता, असा जाब पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारणार असल्याचे जिग्नेश मेवाणी म्हणाले होते. 'माझ्यासारख्या प्रस्थापित दलित नेत्याला लक्ष्य करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लाखो दलित बांधवांना काय संदेश देत आहेत, असा सवालही यावेळी केला होता. याचबरोबर, देश कॅशलेस होण्याआधी कास्टलेस होण्याची आवश्यकता असल्याचे जिग्नेश मेवाणी म्हणाले होते.  

टॅग्स :yuva hunkaar rallyयुवा हुंकार रॅलीJignesh Mevaniजिग्नेश मेवानीNew Delhiनवी दिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा