पूर्वेकडील लडाखमध्ये चीनबरोबर LACवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढविला आहे. त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल म्हणाले की, पंतप्रधान मोदींची ताकदवान नेत्याची तयार केलेली 'खोटी प्रतिमा' ही त्यांची कधी काळी सर्वात मोठी शक्ती होती, परंतु आज ती भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली आहे. राहुल म्हणाले की, पंतप्रधानांना फक्त त्यांच्या ५६ इंच छातीच्या प्रतिमेची चिंता आहे आणि चीन याचा फायदा घेत आहे. राहुल गांधींनी ट्विट केले की, 'सत्तेसाठी ते एक मजबूत नेता असल्याचा भ्रम मोदींनी पसरविला आहे. ही त्यांची सर्वात मोठी शक्ती होती. आता ही भारताची सर्वात मोठी दुर्बलता बनली आहे. राहुल गांधींनी ट्विटबरोबरच त्यांचे व्हिडीओ स्टेटमेंटही प्रसिद्ध केले आहे.'चिनी लोक आमच्या भागात घुसले आहेत, ते व्यूहरचनेशिवाय काहीही करत नाहीत'राहुल गांधी म्हणाले की, चीन जे काही करतो ते त्यांच्या रणनीतीचा भाग असते, जे समजून घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले, 'हा केवळ सर्वसाधारण सीमेवरील वाद नाही. चिनी लोक आमच्या भागात घुसले आहेत ही माझी चिंता आहे. चिनी विचार न करता कोणतीही गोष्ट करत नाहीत. त्यांच्या मनात जगाचा नकाशा तयार आहे आणि ते जगाला स्वत:नुसार आकार देत आहेत. ते जे काय करीत आहेत, ते योजनेनुसारच करत आहेत. ग्वादरदेखील त्याचा एक भाग आहे आणि बेल्ट अँड रोड प्रकल्पसुद्धा त्याचाच हिस्सा आहे. ते जगाची पुनर्रचना करीत आहे. म्हणून जेव्हा आपण चीनचा विचार करता ,तेव्हा आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागेल. काश्मीरमध्ये पाकिस्तानबरोबर मिळून भारताला अडचणीत आणण्याचा डावकाँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी मोदी सरकारला इशारा दिला की, पाकिस्तानसह मिळून चीन काश्मीरमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न करीत आहे. 'धोरणात्मक पातळीवर ते आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मग ते गलवान असो, डेमचाक असो किंवा पांगांग लेक असो. त्यांना आपली स्थिती मजबूत करायची आहे. ते आमच्या महामार्गामुळे अस्वस्थ आहेत आणि त्यांना आपला महामार्ग नष्ट करायचा आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानबरोबर मिळून काहीतरी केले पाहिजे, असा त्यांचा व्यापक विचार आहेत.चीनचा मोदींवर अतिशय खास मार्गाने दबाव राहुल गांधी म्हणाले की, हा सर्वसाधारण सीमेवरील वाद नाही, परंतु तो अत्यंत विचारपूर्वक तयार केला गेला आहे. हा सर्वसाधारण सीमा वादविवाद नाही. पंतप्रधानांवर दबाव आणण्याचा हा एक भाग असून, ते अतिशय खास मार्गाने दबाव आणत आहेत. ते पंतप्रधानांच्या प्रतिमेवर हल्ला करीत आहेत. त्यांना माहीत आहे की एक प्रभावी राजकारणी म्हणून राहण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या छप्पन इंचाच्या कल्पनेचे संरक्षण केले पाहिजे. ते प्रत्यक्षात नरेंद्र मोदींना सांगत आहेत की, आम्ही जे बोलतोय ते केलं नाही तर आपण नरेंद्र मोदींच्या ताकदवान नेत्याची प्रतिमा खराब करू. ''पंतप्रधानांना त्यांच्या प्रतिमेची चिंता, भारत अडचणीत येईल'पंतप्रधानांनी चीनच्या दबावाखाली आल्याची मला चिंता वाटत असल्याचे कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'आता प्रश्न पडतो की नरेंद्र मोदी कशी प्रतिक्रिया देतात. ते आव्हान स्वीकारतील की अजिबात नाही म्हणतील? मी भारताचा पंतप्रधान आहे आणि मला माझ्या प्रतिमेची पर्वा नाही. मी तुम्हाला सामोरे जाईन किंवा धडा शिकवेन. मला आतापर्यंत याची काळजी वाटते, पंतप्रधान दडपणाखाली आले आहेत. माझ्या चिंतेची बाब अशी आहे की, चिनी लोकांनी आमच्या भागात प्रवेश केला आहे आणि पंतप्रधान असे उघडपणे सांगत आहेत की तसे काहीही झालेले नाही. हे स्पष्टपणे दर्शविते की त्यांना त्यांच्या प्रतिमेबद्दल चिंता आहे आणि ती जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
हेही वाचा
भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'
सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर
सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...
ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज
सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित