कोचिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जवळच्या 15 मित्रांना कमाल उत्पन्न गॅरंटी दिली असून शेतकऱ्यांना मात्र फसविले आहे. तुम्ही अनिल अंबानी असाल तर या योजनेचा लाभ मिळेल. या उलट काँग्रेस किमान उत्पन्न योजना आणली असून ही योजना सर्व भारतीयांसाठी लागू होईल, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
काँग्रेसने सत्तेत येताच तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. 2019 मध्ये लोकसभेमध्ये सत्तेत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षांत शेतकऱ्यांविरोधात जे गुन्हे केले आहेत, ते दुरुस्त करू. केरळातील तरुण आणि महिलांनी राजकीय क्षेत्रात वरिष्ठ पदावर जावे, केरळच्या महिला यासाठी सक्षम असल्याचे राहुल केरळमधील सभेदरम्यान म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षांत एकच काम केले, ते म्हणजे एका मागोमाग एक खोटे बोलने. यामुळे देशाचा वेळ वाय़ा गेला. तरणांना 2 कोटी रोजगार उपलब्ध करण्याचेही आश्वासन त्यांनी दिलेले. किती जणांना रोजगार मिळाले ही आकडेवारीच समोर आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.