जालंधर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांना प्रदीर्घ मुलाखत दिल्यानंतर आज पंजाबमधून मोदींनी आपल्या प्रचार अभियानास सुरुवात केली आहे. दरम्यान, जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे इंडियन सायन्स काँग्रेसचे उदघाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच संशोधनालाही महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणांमध्ये जय अनुसंधान हा नाराही जोडला. यावेळी मोदी म्हणाले की, ''शेकडो वर्षांपासून संशोधक जे संशोधन करत आहेत. त्याचा फायदा देशाला मिळणार आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. माजी पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसान यांच्यासोबत जय विज्ञान असा नारा दिला होता. आता मी यामध्ये जय अनुसंधान या नाऱ्याची भर घालतो.''
मोदींनी दिला नवा नारा, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 3:34 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. च संशोधनालाही महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणांमध्ये जय अनुसंधान हा नाराही जोडला